सांगोल्याचा पुढचा आमदार भाजपचाच असेल : के. के. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:36+5:302021-08-17T04:27:36+5:30

भारतीय जनता पक्षाची १५ ऑगस्ट रोजी सांगोला येथील हॉटेल ज्योतिर्लिंग येथे बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ...

Sangoli's next MLA will be from BJP: K. K. Patil | सांगोल्याचा पुढचा आमदार भाजपचाच असेल : के. के. पाटील

सांगोल्याचा पुढचा आमदार भाजपचाच असेल : के. के. पाटील

googlenewsNext

भारतीय जनता पक्षाची १५ ऑगस्ट रोजी सांगोला येथील हॉटेल ज्योतिर्लिंग येथे बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माढा लोकसभा विस्तारक शरद झेंडे, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, गणेश कदम, विजय बाबर, पप्पू पाटील, तानाजी कांबळे, माणिक सकट, शिवाजी ठोकळे, अनिल कांबळे, नागेश जोशी, विलास होनमाने, नरेश बाबर, बाळकृष्ण येलपले, शिवाजी आलदर, दुर्वा हिप्परकर, राहुल व्हनमाने, देवीदास कांबळे, डॉ. जयंत केदार, आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहनत घेऊन सर्वसामान्यांसाठी काम करीत आहेत. त्यामुळेच सर्वत्र भाजपला यश मिळाले. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांची मोठी जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गंगा वाहत असल्याने तरुणाईचा कल भाजपकडे वाढला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. मात्र शिवसेनेने विश्वासघात केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही परिस्थितीत २०२४च्या विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभा मतदासंघातून आमदार भाजपच्या चिन्हावर विजयी झाला पाहिजे, असे के. के. पाटील यांनी सांगितले.

कोट ::::::::::::::::

समर्थ बूथ अभियान म्हणजे भाजपचा आत्मा आहे. पश्चिम महाराष्ट्रात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. दोन वर्षांत सांगोला तालुक्यात भाजपची ४० हजार सभासद नोंदणी केली. सांगोला तालुक्याचा आमदार भाजपचा करण्यासाठी समर्थ बूथ अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.

- चेतनसिंह केदार-सावंत

भाजप तालुकाध्यक्ष, सांगोला

Web Title: Sangoli's next MLA will be from BJP: K. K. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.