गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त सांगोल्यात स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:21 AM2020-12-22T04:21:51+5:302020-12-22T04:21:51+5:30

नगरपरिषदेमार्फत सांगोला शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू असल्यामुळे या अभियानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सभापती छाया मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली ...

Sanitation campaign in Sangola on the occasion of Gadge Baba's death anniversary | गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त सांगोल्यात स्वच्छता अभियान

गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त सांगोल्यात स्वच्छता अभियान

Next

नगरपरिषदेमार्फत सांगोला शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू असल्यामुळे या अभियानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सभापती छाया मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली सांगोला नगरपरिषद, राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाद्वारे सांगोला न्यायालय, मुख्याधिकारी निवास, ईदगाह मैदानासह क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता केली. शहराच्या स्वच्छतेची एक चांगली मोहीम या सामाजिक संस्थांद्वारे सुरू केली असून, प्रत्येक रविवारी शहराच्या विविध भागांमध्ये या मोहिमेद्वारे स्वच्छता केली जाणार आहे. त्यानुसार २७ डिसेंबर रोजी चिंचोली रोड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

यावेळी नगराध्यक्षा राणी माने, आरोग्य सभापती छाया मेटकरी, गटनेते आनंदा माने, नगरसेवक अस्मिर तांबोळी, नगरसेविका अप्सरा ठोकळे, माजी नगरसेवक माऊली तेली, सूर्यकांत मेटकरी, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे, सोमनाथ ठोकळे, राजमाता महिला पतसंस्थेच्या चेअरमन नसरीन तांबोळी, संचालिका प्रियांका श्रीराम, मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, दीपक श्रीराम, आरिफ मुलाणी, देवा गावडे, सागर दिवटे, शेखर गडहिरे, दिलीप जानकर, राजमाता महिला पतसंस्थेच्या सचिव मनीषा हुंडेकरी, सौरभ मेटकरी, नगरपरिषद कर्मचारी सोमनाथ बनसोडे, हणमंत लोखंडे, सूरज शेख यांच्यासह वृक्ष प्राधिकरणाचे कर्मचारी प्रशांत पारसे, वैभव बदडे, विकास शेंबडे, भागवत राऊत आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

सांगोल्यात स्वच्छता अभियान मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा राणी मानेंसह नगरसेवक, नगरसेविका, सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

----

Web Title: Sanitation campaign in Sangola on the occasion of Gadge Baba's death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.