सायकलच्या सुट्ट्या भागापासून साकारला सॅनिटायझर ब्रेक स्प्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 02:27 PM2020-10-05T14:27:36+5:302020-10-05T14:27:39+5:30

मेकॅनिकचे जुगाड तंत्र : दुकाने, दवाखान्यात वापर सुरू

Sanitizer brake spray from the holiday section of the bicycle | सायकलच्या सुट्ट्या भागापासून साकारला सॅनिटायझर ब्रेक स्प्रे

सायकलच्या सुट्ट्या भागापासून साकारला सॅनिटायझर ब्रेक स्प्रे

googlenewsNext

सोलापूर : सायकलच्या हँडलचा रॉड, ब्रेक आणि ब्रेक वायरचा उपयोग करून येथील फारुक सय्यद या सायकल मेकॅनिकने आपल्या कल्पनाशक्तीला जुगाड तंत्राची जोड देऊन सॅनिटायझर स्प्रे तयार केला असून,शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये तसेच दुकानांमध्ये हा स्प्रे बसविण्यात आला आहे. या स्प्रेला पेटंट मिळण्यासाठी आता फारुकचा प्रयत्न सुरू आहे.

फारुक हे वयाच्या आठ वर्षांपासून सायकल दुरुस्तीचे काम करतात. ते नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करीत असतात. दुरुस्तीचे काम करतानाच त्यांनी आजवर एक हजार सायकलींना आधुनिक रूप दिले आहे.  कोरोनाच्या लढ्यात आपणही  आपल्या क्षमतेने उतरले पाहिजे. 

सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असे काही शोधून ते सादर केले पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात नेहमी घोळत होता. त्यातूनच त्यांनी हा ब्रेक सॅनिटायझर स्प्रे तयार केला आहे. फारुकचा स्प्रे अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. शिवाय तो विचारण्यासाठी येणाºया प्रत्येकाला डेमो दाखवत आहेत. त्याच्या या स्प्रेचा लौकिक बंगळुरुपर्यंत पसरला आहे.

ब्रेक स्प्रेचा वापर असा
दुकान मालक आपल्या गल्ल्यावर बसून किंवा सेल्समन काऊंटरवर उभा राहून हाताने ब्रेक दाबून सॅनिटायझरचा स्प्रे मारू शकतो. यासाठी स्प्रेचे टोपण असलेली बाटली वापरण्यात आली असून, टोपणाला असलेल्या स्प्रेच्या दांड्याला ब्रेक वायर बसविण्यात आली आहे. या वायरच्या एका टोकाला सायकलचा हँडल बार आहे. त्यावर सायकलचे ब्रेक आहे. हे ब्रेक पायानेही दाबता येते. सॅनिटायझरची बाटली ठेवण्याचे स्टँड सायकलच्या तारांपासून तयार केले आहे.  आतापर्यंत न्यायालयात २५, शहरातील डॉक्टर ५, सोलापूर महानगरपालिका १, घरगुती  १५ते २० नागरिकानी हे यंत्र विकत घेतले आहे.

Web Title: Sanitizer brake spray from the holiday section of the bicycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.