ग्रामपंचायत ताब्यात राखण्यात संजय कोकाटेंना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:31 AM2021-02-26T04:31:20+5:302021-02-26T04:31:20+5:30
विधानसभा निवडणूक लढवलेले शिवसेनेचे संजय कोकाटे यांचे माळेगाव हे गाव असल्याने संपूर्ण माढा तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले ...
विधानसभा निवडणूक लढवलेले शिवसेनेचे संजय कोकाटे यांचे माळेगाव हे गाव असल्याने संपूर्ण माढा तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. संजय कोकाटे यांच्या गावचा विकास पॅनलने ९ पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक शिवाजी पाटील यांच्या रोकडाई देवी विकास पॅनलने ३ जागा जिंकल्या. सरपंच पदाच्या निवडीवेळी सरपंच पदासाठी कोकाटे गटाचे भागवत कोकाटे यांचा व उपसरपंच पदासाठी छाया लोंढे यांचेचे अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एच. डी. जाधव यांनी त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बळीराम अनंत कळस, तुकाराम गायकवाड, पूजा गायकवाड, आनंदा लोंढे, नारायण नरसाळे, विठ्ठल गायकवाड, धोंडिराम गायकवाड, नारायण गायकवाड, संजय लोकरे, सुखदेव हुंबे, महावीर गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, रमेश गायकवाड, विशाल गायकवाड, भारत गायकवाड, परमेश्वर लोकरे, दत्तात्रेय साळुंखे, परमेश्वर गायकवाड, अरुण गायकवाड, शशिकांत गोसावी, तुकाराम पाटील, गणपत हुंबे, सतीश पाटील, धनाजी गायकवाड, लक्ष्मण लोंढे, सुदर्शन लोंढे, बालाजी लोंढे, रामभाऊ पाटील, महादेव साळुंखे, दत्तात्रेय लोंढे, शहाजी गायकवाड, योगीराज गायकवाड, बालाजी गायकवाड, संतोष गायकवाड, परमेश्वर सुरवसे, दशरथ गोसावी, हरिभाऊ शिंदे, बाळासाहेब शिंदे, आजिनाथ चव्हाण, विजय गायकवाड, बंडू वाघमोडे, महादेव कांबळे, तुकाराम जाधव, विनोद जावळे, कृष्णा कोल्हे, सुखदेव गायकवाड, विनोद पवार, महादेव गायकवाड, अंकुश गायकवाड, विजय लोंढे, प्रभाकर पाटील, संजय टोणपे, रेवण ढवळे, मारुती वाघमोडे उपस्थित होते.
निवडीनंतर नूतन सरपंच भागवत कोकाटे व उपसरपंच छाया लोंढे यांना संजय कोकाटे यांनी सत्कार केला.
फोटो
२५माळेगाव०१
ओळी
माळेगावच्या सरपंचपदी भागवत कोकाटे, उपसरपंचपदी छाया लोंडे यांच्या निवडीनंतर जल्लोष करताना विजयी उमेदवारांसह संजय कोकाटे.