सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संजय शिंदे बिनविरोध, उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील
By admin | Published: March 21, 2017 03:23 PM2017-03-21T15:23:18+5:302017-03-21T15:23:18+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संजय शिंदे बिनविरोध, उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संजय शिंदे बिनविरोध, उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप पुरस्कृत महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी रणजितकुमार यांनी जाहीर केली़
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेत मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती़ निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ प्रारंभी सकाळी ११ च्या सुमारास राष्ट्रवादीकडून शेकापच्या अनिल मोटे तर उपाध्यक्षपदासाठी श्रीमंत थोरात तर भाजप पुरस्कृत महाआघाडीकडून अध्यक्षपदासाठी संजय शिंदे तर उपाध्यक्षपदासाठी शिवानंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता़ मतदानासाठी दुपारी २ ची वेळ दिली होती़ त्यासाठी दुपारी २ वाजता भाजपा पुरस्कृत महाआघाडीच्या सर्वच उमेदवारांनी हेरिटेज हॉटेलमधून गाड्यांच्या ताफ्यासह जिल्हा परिषदेत दाखल झाले होते़ राजकीय मोर्चेबांधणीत यशस्वी झालेल्या महाआघाडीच्या उमेदवारांना ६९ सदस्यांपैकी ४७ सदस्यांचे मतदान होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती़ त्यामुळेच की काय ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ही जिल्हा परिषदेची निवडणुक बिनविरोध झाली़
राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या़ त्या पाठोपाठ काँग्रेस तसेच काही स्थानिक आघाड्याही राष्ट्रवादीच्या बाजुनं होत्या़ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष व उपाध्यक्ष सहज होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ मात्र माढ्याचे अपक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी बरोबर न जाता स्वत:च मोर्चबांधणी सुरू केली़ त्यानुसार भाजप व काही स्थानिक आघाड्यांना सोबत घेण्यात संजय शिंदे यशस्वी ठरले़
यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आ़ प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आ़ सिध्दाराम म्हेत्रे, उत्तम जानकर, धनराज शिंदे, आ़ बबनदादा शिंदे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, रणजितसिंह शिंदे, शहाजीबापू पाटील यांच्यासह महाआघाडीचे अन्य नेते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते़