कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:19 PM2019-04-06T12:19:39+5:302019-04-06T12:24:42+5:30

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही अशीही टिका माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

Sanjayama took the maximum power of collapse: Dhoble | कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे

कोलांटउड्या मारत संजयमामांनी सर्वात जास्त सत्ता भोगली : ढोबळे

Next
ठळक मुद्दे१२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो - लक्ष्मण ढोबळेशेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे - लक्ष्मण ढोबळे

सोलापूर : १२२ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण पाण्याला शिस्त नसल्यामुळे पाणी उशाला असूनही शेतकºयांना मनस्ताप होतो. उजनीचे पाणी पुण्यातील प्रकल्पांना नको होते. इंदापूरमधील अनेक प्रकल्पांनी क्षमतेपेक्षा जास्त पाणी घेतले. एनटीपीसी प्रकल्पाला शेतकºयांचे दोन टीएमसी पाणी देऊन अवघा शेतकरी देशोधडीला लावला,  अशी टीका माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी एका पत्रकातून केली आहे.
संजय मामांसारखा नेता केवळ स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांच्या कानाला लागला.

केवळ नातेवाईकांनाच कामे मिळावीत म्हणून हलक्या राजकारणाची रीत वापरली. कोलांटउड्या मारून सर्वात जास्त सत्ता भोगणारा नेता म्हणून संजयमामांना दोष द्यावा लागेल. जिल्ह्यात सर्वच साखरसम्राटांनी टनाला सरासरी दोन हजारांचा भाव दिला. लोकनेते साखर कारखाना खासगी करून तेवढ्यावर समाधान झाले नाही. दोनशे रुपये कमी करून टनाला १८०० रुपये भाव दिला. शेतीला खड्ड्यात घालणाºया नेत्याला जाब कोण विचारणार? या सर्वच दंडेलशाहीचा परिणाम म्हणून जिल्ह्यात शिंदेशाहीला पराभूत करणे हा भाजपचा संकल्प आहे. १० वर्षे संजय शिंदे यांनी स्वार्थासाठी समविचारी आघाडीचे नाटक वठविले.

सुडाचे राजकारण करताना जिल्ह्याचा नेता होण्यासाठी हलक्या कानाचे निरोप श्रेष्ठींना सांगण्यात धन्यता मानली तर आ. बबनदादांनी आपल्या क्षेत्रात अडथळा नको म्हणून संजयमामांना करमाळ्याकडे रेटले आणि मुलाचा राजकीय रस्ता डांबरी केला.

सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही. तरीही हसतमुखरावांनी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर जिल्हा २० वर्षे ताब्यात ठेवला. शिंदे हे अनिवासी सोलापूरकर असल्याने स्टेशनवरून घरी त्यांना स्वागत करून आणावे लागते.

नव्या उमेदवारास वारसा नोंदीची गरज नसल्याने उद्याच्या राजकारणात अक्कलकोट आणि दक्षिण यामध्ये कुणाला पराभूत करण्याचे कारस्थान उरत नाही. शिंदेशाहीने राजाश्रयाच्या नादात लोकाश्रय गमावला असून, वारसाला मोठे करण्याच्या नादात साथीदार दुखावले. कुठे खरटमल तर कुठे चाकोते यांना झळ लागली. एक साधारण पीएच्या कौतुकासाठी विष्णुपंतांसारखा माणूस दूर केला. वेळ आल्यावर कधी माने तर कधी साठे कुटुंबाला अपमानित केले. सतत म्हेत्रे कुटुंबाला पाण्यात पाहिले, असाही आरोप लक्ष्मण ढोबळे यांनी केला.

Web Title: Sanjayama took the maximum power of collapse: Dhoble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.