संस्कार मातोश्री : सुवर्णा म्हेत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:51+5:302021-02-23T04:34:51+5:30
१९६८ च्या काळात जन्मलेल्या संस्कारी सुवर्णा म्हेत्रे यांचा विवाह माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत १ मे १९८५ साली झाला. ...
१९६८ च्या काळात जन्मलेल्या संस्कारी सुवर्णा म्हेत्रे यांचा विवाह माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत १ मे १९८५ साली झाला. स्व. सुवर्णा म्हेत्रे यांनी सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेतला. स्वतःच्या संसाराची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही. त्यांनी आपल्या पाल्यांना घडवले. सिद्धाराम म्हेत्रे यांनी आमदार, गृहराज्यमंत्री पदासह विविध क्षेत्रांत सतरा वर्षे प्रतिनिधित्व भूषविले. समाजासाठी संपूर्ण वेळ देणाऱ्या सिद्धाराम म्हेत्रे यांना स्व. सुवर्णा म्हेत्रेंनी स्वतःच्या संसाराविषयी तक्रार मांडली नाही. याउलट अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करा, असा हट्ट धरला. मातोश्री लक्ष्मी शुगर्सच्या माध्यमातून शेतकरी व तरुणांसाठी झटावे लागेल, असा सल्ला चिरंजीव
समाज घडण्यासाठी आदर्श कुटुंबाचे योगदान महत्त्वाचे ठरते आणि म्हणूनच सिद्धाराम म्हेत्रे यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांच्या धर्मपत्नी स्व. सुवर्णा म्हेत्रे यांचा फार मोठा वाटा आहे. म्हणूनच समाज घडण्यासाठी प्रत्येक कुटुंबात स्व. सुवर्णा म्हेत्रे यांच्यासारखी माता जन्माला यावी, हीच शब्दरूप श्रद्धांजली..!
संकलन-शंभुलिंग अकतनाळ