संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी; पंढरपूर-घुमान रथ अन् सायकल यात्रेचा प्रारंभ

By काशिनाथ वाघमारे | Published: November 19, 2023 03:35 PM2023-11-19T15:35:41+5:302023-11-19T15:36:29+5:30

या यात्रेचा प्रारंभ २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर होणार आहे.

sant namdev maharaj jayanti on thursday | संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी; पंढरपूर-घुमान रथ अन् सायकल यात्रेचा प्रारंभ

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी; पंढरपूर-घुमान रथ अन् सायकल यात्रेचा प्रारंभ

काशिनाथ वाघमारे, सोलापूर  : श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) अशी सुमारे २,१०० किलोमीटर रथ व सायकल यात्रा निघणार आहे. या यात्रेचा प्रारंभ २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर संत नामदेव महाराज यांच्या १७ वे वंशज हभप ज्ञानेश्वर माऊली नामदास यांच्या हस्ते पंढरपुरात उमा महाविद्यालय येथे सकाळी ६ वाजता होणार असल्याची माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली.

भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त ही सायकल यात्रा निघत आहे. भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यांच्यासमवेत धर्मप्रसाराचे काम संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केले. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने गतवर्षी भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव समाजोन्नती परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही सायकल यात्रा सुरू झाली. भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव दरबार कमिटी (घुमान) व देशभरातील विविध नामदेव शिंपी समाज संस्था-संघटनांच्या वतीने ही यात्रा निघणार आहे. या यात्रेत शंभर सायकलयात्री सहभागी होणार आहेत. ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी ११ डिसेंबर रोजी घुमान येथे पोचणार आहे.

पंजाबचे राज्यपाल करणार स्वागत

या सायकल यात्रेचे नऊ डिसेंबर रोजी चंडीगड येथे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे स्वागत करतील. त्यांच्या हस्ते पादुकांची पूजा होणार आहे. घुमान येथे १२ डिसेंबर रोजी या यात्रेचा समारोप होईल. २३ डिसेंबर रोजी रथयात्रा पंढरपूर येथे पोहोचेल

Web Title: sant namdev maharaj jayanti on thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.