सोलापुरातील संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:01 PM2019-06-10T16:01:45+5:302019-06-10T16:05:56+5:30

सोलापूर महापालिकेचे दुर्लक्ष; राणी लक्ष्मीबाई उद्यानाची दुरवस्था,  सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अडकली कागदात

Sapphi lake in Solapur, waterproof siege | सोलापुरातील संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा

सोलापुरातील संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा

Next
ठळक मुद्देधर्मवीर संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा पडला असून, महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्षतलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अद्याप कागदी घोड्यांमध्ये अडकून पडलीसंभाजी तलाव हे शहरातील एक उत्तम पर्यटनस्थळ आणि पशुपक्ष्यांचा अधिवास असलेले ठिकाण

सोलापूर : धर्मवीर संभाजी तलावाला जलपर्णीचा वेढा पडला असून, महापालिकेचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. तलावाच्या सुशोभीकरणाची निविदा प्रक्रिया अद्याप कागदी घोड्यांमध्ये अडकून पडली आहे. राणी लक्ष्मीबाई उद्यानाची दुरवस्था झाली आहे. 
संभाजी तलाव हे शहरातील एक उत्तम पर्यटनस्थळ आणि पशुपक्ष्यांचा अधिवास असलेले ठिकाण आहे.  ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी रविवारी तलाव परिसराची पाहणी केली. राणी लक्ष्मीबाई उद्यानाच्या बाजूने असलेल्या तलावाच्या कठड्यांची दुरवस्था झाली आहे.

उद्यानात गवत वाढले असून तलावाच्या काठावरील फूटपाथही खराब झाला आहे.  कठडे फुटलेले असून आजूबाजूला कचरा पडलेला होता. विसर्जन हौदांची कचरा कुंडी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील काही नागरिक या हौदात कचरा टाकत असल्याचे पाहायला मिळाले. तलावात जलपर्णीचा वेढा पडला असून पाण्यावर गवताचा गालीचा तयार झाल्याची स्थिती आहे. या जलपर्णीमुळे एरव्ही मुक्त विहार करणारे बगळे गायब होते. स्मृती वनाच्या बाजूला गवत आणि कचरा वाढला आहे.

केंद्रीय सरोवर संवर्धन योजनेतून संभाजी तलावाच्या सुशोभीकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेने दोनवेळा निविदा काढल्या. कंत्राटदार न मिळाल्याने निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. तलावाचे सुशोभीकरण होणार असल्याने नगर अभियंता कार्यालय आणि उद्यान विभागाने तलाव परिसराचे दुर्लक्ष केले आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरातील काही तरुणांनी जलपर्णी काढली होती, परंतु महापालिकेला जलपर्णी काढण्यास वेळच मिळाला नाही. उद्यान विभागाकडे कर्मचाºयांची कमतरता असल्याने त्यांनीही तलाव आणि राणी लक्ष्मीबाई उद्यानाकडे दुर्लक्ष केले आहे. 

सामाजिक संघटनांनी बोलावली बैठक 
- संभाजी तलावाला अच्छे दिन यावेत यासाठी शहरातील सामाजिक संघटना एकत्र येत आहेत.  संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम आणि होटगी रोड सोशल फाउंडेशनचे शाम पाटील यांच्या पुढाकाराने मंगळवारी सायंकाळी राणी लक्ष्मीबाई उद्यानात शहरातील सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

मनपा प्रशासन कार्यरत आहे का? 
- संभाजी तलावाची अवस्था पाहता महापालिकेचे प्रशासन कार्यरत आहे का? असा प्रश्न पडतो. वन्यजीवांची काळजी म्हणून या तलावातील जलपर्णी हटविण्याचे काम सुरू करायला हवे. गेल्या एक वर्षापासून केंद्र शासनाच्या योजनेतून काम होणार असल्याचे सांगितले जात आहे. हे काम होईल तेव्हा होईल. सध्या जलपर्णी हटवा, असे नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे सदस्य पप्पू जमादार म्हणाले.

Web Title: Sapphi lake in Solapur, waterproof siege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.