सोलापूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुन्हा निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 12:35 PM2021-02-04T12:35:16+5:302021-02-04T12:35:21+5:30

जाणून घ्या; कोणत्या आहेत त्या १५ ग्रामपंचायती...

Sarpanch of 15 Gram Panchayats in Solapur district will leave reservation and leave again | सोलापूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुन्हा निघणार

सोलापूर जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत पुन्हा निघणार

googlenewsNext

सोलापूर : जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण काढताना प्रशासनाकडून चुका झाल्या. या चुकांमुळे माढा, बार्शी तसेच करमाळा तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत चुकले आहे. तसा अहवाल तहसीलदारांनी प्रशासनाकडे दिला आहे. त्यामुळे या १५ ग्रामपंचायतीचे नव्याने आरक्षण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागितले आहे.

अधिक माहिती देताना महसूल उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले, माढा तालुक्यात ६, बार्शी तालुक्यातील ७ तर करमाळा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

माढा तालुक्यातील परिते, लहू, तांबवे या ग्रामपंचायतींचे आरक्षण अनु.जाती स्त्री ऐवजी अनुसूचित जाती असे वाचण्यात आले. ग्रामपंचायत भोगेवाडी-जाखले, अरण व रिधोरे या ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जातीऐवजी अनुसूचित जाती स्त्री असे काढण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील कुंभेज ग्रामपंचायतीचे आरक्षण नागरिक मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण व फिसरे नागरिक मागासवर्ग प्रवर्ग पडले आहे. दोन्ही तहसीलदारांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना अहवाल सादर केला आहे.

बार्शी तालुक्यातील कापसी, सुर्डी, तुळशीदास नगर, तांदूळवाडी, ममदापूर, घाणेगाव व हिंगणी या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण चुकीचे निघाले आहे. कापसी, सुर्डी, तुळशीदास नगर,तांदूळवाडी, ममदापूर या गावांत सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे, तर घाणेगाव व हिंगणी या गावात मागासवर्गीय प्रवर्ग महिला आरक्षण निघाले आहे.

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींचे आरक्षण चुकीचे निघाल्याचा अहवाल तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनुसार आरक्षण बदलण्याबाबत मार्गदर्शन मागवले आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर बदल करण्यात येणार आहे.

Web Title: Sarpanch of 15 Gram Panchayats in Solapur district will leave reservation and leave again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.