२२ गावच्या सरपंच, २४ गावच्या उपसरपंच निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:02+5:302021-02-06T04:39:02+5:30

तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. या गावातील सरपंच निवडी येत्या मंगळवारी व गुरुवारी होणार आहेत. बाणेगाव, बेलाटी, भागाईवाडी, ...

Sarpanch of 22 villages, Deputy Sarpanch of 24 villages elected | २२ गावच्या सरपंच, २४ गावच्या उपसरपंच निवडी

२२ गावच्या सरपंच, २४ गावच्या उपसरपंच निवडी

Next

तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. या गावातील सरपंच निवडी येत्या मंगळवारी व गुरुवारी होणार आहेत. बाणेगाव, बेलाटी, भागाईवाडी, बीबीदारफळ, भोगाव, एकरुख- तरटगाव, गुळवंची, हगलूर, हिरज, तळेहिप्परगा, होनसळ, खेड, कळमण, कोंडी, नान्नज, पडसाळी, पाथरी, राळेरास, साखरेवाडी, सेवालालनगर, तेलगाव, तिर्हे या गावची सरपंच, उपसरपंच निवड ९ तर वांगी, वडाळा या गावचे सरपंच, उपसरपंच ११ फेब्रुवारी रोजी निवडले जाणार आहेत.

---

या आरक्षणातील होतील सरपंच

- वांगी व खेडचे सरपंचपद आरक्षणातील सदस्य नसल्याने रिक्त राहणार मात्र उपसरपंच निवड होणार.

- पडसाळी (अनुसूचित जाती), हगलूर, साखरेवाडी, कोंडी(ओबीसी महिला), तळेहिप्परगा, तेलगाव, भागाईवाडी (ओबीसी).

- होनसळ, बेलाटी, भोगाव, सेवालालनगर, एकरुख-तरटगाव, नान्नज, पाथरी (सर्वसाधारण महिला).

- बिबीदारफळ, वडाळा, हिरज, तिर्हे, गुळवंची, बाणेगाव, राळेरास व कळमण (सर्वसाधारण).

Web Title: Sarpanch of 22 villages, Deputy Sarpanch of 24 villages elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.