नांदणीत शिवीगाळ केल्याच्या रागातून सरपंचांच्या भावाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:16 AM2021-06-22T04:16:17+5:302021-06-22T04:16:17+5:30

सोलापूर : भावाला शिवीगाळ करतोस का? असा जाब विचारत गजानन सुरवसे यांनी पांडुरंग बंडे यांना लाकडाने बेदम मारहाण केल्याची ...

Sarpanch's brother beaten to death in anger over insulting Nandini | नांदणीत शिवीगाळ केल्याच्या रागातून सरपंचांच्या भावाला बेदम मारहाण

नांदणीत शिवीगाळ केल्याच्या रागातून सरपंचांच्या भावाला बेदम मारहाण

Next

सोलापूर : भावाला शिवीगाळ करतोस का? असा जाब विचारत गजानन सुरवसे यांनी पांडुरंग बंडे यांना लाकडाने बेदम मारहाण केल्याची फिर्याद मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह पंधरा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सोमवारी सकाळी नांदणी (ता. द. सोलापूर) येथे घडली.

माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांचे बंधू गजानन सुरवसे सकाळी पांडुरंग बंडे यांच्या घरासमोर जाऊन माझे भाऊ चिदानंद सुरवसे यांना तू शिवीगाळ का केलीस? आमच्याकडे त्याचे रेकॉर्डिंग आहे म्हणत लाकडाने मारहाण सुरू केली. पांडुरंग बंडे हे विद्यमान सरपंच शिवानंद बंडे यांचे बंधू आहेत. घटना घरासमोरच होत असताना बंडे यांच्या पत्नी निर्मला, मुलगा मच्छिंद्र आणि सून लक्ष्मीमध्ये पडले असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत रवी बरगली सुरवसे, राहुल बरगली सुरवसे, राजशेखर शिवाजी सुरवसे, धानप्पा शिवाजी सुरवसे, म्हाळपा कल्लप्पा सुरवसे, श्रीकांत कल्लाप्पा सुरवसे, बिरप्पा रामचंद्र सुरवसे, बिरप्पा बरगली सुरवसे (सर्व रा. नांदणी), राजू जाधव, पंडित राठोड (रा. बसवनगर), परमेश्वर कुलकर्णी (हत्तुर) यांनी बंडे यांच्यासह चौघांना जखमी केले. काही वेळाने लाल रंगाच्या बोलेरो जीपमधून आलेल्या आकाश राजकुमार बंदीछोडे यांनी हल्लेखाेरांना काट्या पुरवल्या. याचदरम्यान माजी सरपंच चिदानंद नागेश सुरवसे आणि शिवानंद म्हाळप्पा सुरवसे बोलेरोमध्ये बसून होते, अशी तक्रार पांडुरंग बंडे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल केली आहे

Web Title: Sarpanch's brother beaten to death in anger over insulting Nandini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.