सोलापुरात बसून चुकीचा अहवाल दिला; निरीक्षक पदावरून प्रांताधिकाऱ्यांना हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:19+5:302021-01-14T04:19:19+5:30
तालुक्यात ९४ गावांच्या निवडणुका सुरू आहेत. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने प्रत्येक तालुक्यासाठी एक निरीक्षक नियुक्त केला. बार्शीसाठी प्रातांधिकारी ...
तालुक्यात ९४ गावांच्या निवडणुका सुरू आहेत. या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने प्रत्येक तालुक्यासाठी एक निरीक्षक नियुक्त केला. बार्शीसाठी प्रातांधिकारी हेमंत निकम यांची नियुक्ती केली होती. मुळात कोरोनाकाळापासून निकम व तहसीलदार प्रदीप शेलार यांच्यात कोणत्याच बाबतीत सख्य नाही. त्यांच्यात म्हणावा तसा संवाद नाही. याच दरम्यान निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तहसीलदार प्रदीप शेलार यांनी काही काम केले नाही, असा अहवाल निरीक्षक म्हणून निकम यांनी राज्य आयोगाकडे दिला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्तांना याची चौकशी करण्यास सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची चौकशीसाठी नियुक्ती केली.
त्याचदरम्यान तहसीलदार प्रदीप शेलार यांनी निरीक्षक निकम यांनी प्रत्यक्ष बार्शीत न येता सोलापुरात बसून चुकीचा अहवाल दिल्याची तक्रार केली. त्यामध्ये सत्यता दिसून आल्याने विभागीय आयुक्तांनी निकम यांची नियुक्ती करीत जाधव यांची नियुक्ती केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.