बाजार समितीचे संचालक साठे, चोरेकर ग्रामपंचायतीच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:28+5:302021-01-08T05:11:28+5:30

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांचे वडाळा ग्रामपंचायतीवर १९६५ पासून बळीरामकाका साठे यांचे वर्चस्व आहे. मागील १० वर्षांपासून ...

Sathe, Director, Market Committee, in the arena of Chorekar Gram Panchayat | बाजार समितीचे संचालक साठे, चोरेकर ग्रामपंचायतीच्या आखाड्यात

बाजार समितीचे संचालक साठे, चोरेकर ग्रामपंचायतीच्या आखाड्यात

Next

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांचे वडाळा ग्रामपंचायतीवर १९६५ पासून बळीरामकाका साठे यांचे वर्चस्व आहे.

मागील १० वर्षांपासून त्यांचे चिरंजीव जितेंद्र साठे हे ग्रामपंचायत सदस्य व सध्या उपसरपंच आहेत. साठे हे सोलापूर बाजार समितीचे संचालक आहेत. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जितेंद्र साठे यांनी अनंत सुभेदार यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत जितेंद्र साठे यांची सुदर्शन अवताडे यांच्याशी लढत आहे. नान्नज ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले प्रकाश चोरेकर हे सोलापूर बाजार समितीचे संचालक आहेत. चोरेकर हे नान्नज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक ४ मधून लढत असून, त्यांच्या विरोधात दिनेश मुळे हे उमेदवार आहेत. चोरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे गटाचे असले तरी ते स्थानिक पातळीवर माजी आमदार दिलीपराव माने गटाशी जुळवून घेत ग्रामपंचायत निवडणूक लढत आहेत.

चौकट

साठे-अवताडे नावाने पॅनल

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे गटाच्या पॅनलला लोकनेते बळीरामकाका साठे ग्रामविकास पॅनल विरोधात स्वर्गीय बाबासाहेब अवताडे परिवर्तन पॅनलमध्ये लढत होत आहे. बाबासाहेब अवताडे हे गावपातळीवर काका साठे यांचे राजकीय विरोधक होते. अवताडे यांच्या निधनानंतर आता त्यांचे पुतणे सुदर्शन अवताडे यांनी साठे यांच्याशी राजकीय लढत सुरू केली आहे.

Web Title: Sathe, Director, Market Committee, in the arena of Chorekar Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.