सौरभ अनपटचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:31+5:302020-12-05T04:42:31+5:30
कुर्डूवाडी : चिंचोली (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या सौरभ बाळासाहेब अनपट या विद्यार्थ्यांने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ...
कुर्डूवाडी : चिंचोली (ता. माढा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या सौरभ बाळासाहेब अनपट या विद्यार्थ्यांने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल त्याचे मुख्याध्यापक गोसावी, वर्गशिक्षक सुहास चवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब अनपट यांनी कौतुक केले आहे.फोटो : ०२ सौरभ अनपट
--
मका आधारभूत खरेदी केंद्राला सुरुवात
कुर्डूवाडी : जिल्हा मार्केटिंग व कुर्डूवाडी सबएजंट कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्तरीत्या सुरु केलेल्या आधारभूत मका किंमत खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील- जामगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी बाजार समितीचे संचालक सुरेश बागल, संदीप भोसले, थोरात, माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद, बाजार समितीचे प्रभारी सचिव अजिनाथ बोंगाळे उपस्थित होते.
फोटो : ०२ कुर्डूवाडी मका
मका आधारभूत खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सुहास पाटील-जामगावकर, सुरेश बागल
---बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य
कुर्डूवाडी : प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने माढा तालुक्यात उंदरगाव येथे बांधकाम नोंदणी अभियान अंतर्गत नोंदणीकृत कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच देण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके उपस्थित होते.
फोटो : ०२ प्रहार
---
कुर्डूवाडीत एड्स जनजागृती
कुर्डूवाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी सुनंदा गायकवाड, आरोग्यसेविका, नागरिक उपस्थित होते. यावेळी एड्सबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
फोटो : ०२ एड्स
----
लोकमंगल महाविद्यालयात संविधान दिन साजरा
उत्तर सोलापूर: वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माण तालुक्यातील एस.डी. विद्यालयाचे प्रा. लक्ष्मण मोहिते होते. ‘भारतीय संविधान समज-गैरसमज’ या विषयाच्या माध्यमातून प्रा. मोहिते यांनी भारतीय संविधानातील निर्मितीपासून ते मूलभूत हक्क कार्य, घटनाकारांच्या कल्याणकारी धोरणांचा उल्लेख केला. प्राचार्य डाॅ. सचिन फुगे, रा.से. यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. गणेश पवार, प्राचार्य .डॉ. सचिन, स्वयंसेविका प्राची गोवर्धन, सागर गाडे, अनिकेत काकडे उपस्थित होते.
----