सोलापुरातील मार्कंडेय उद्यानात साकारले सावरकरांचे शिल्पचरित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:29 PM2019-05-29T12:29:04+5:302019-05-29T12:32:35+5:30

स्मारक समितीचा उपक्रम : जयंतीदिनी शिल्पे पाहण्यासाठी सोलापूरकरांची गर्दी

Savarkar's sculpture in the park of Markandeya in Solapur | सोलापुरातील मार्कंडेय उद्यानात साकारले सावरकरांचे शिल्पचरित्र

सोलापुरातील मार्कंडेय उद्यानात साकारले सावरकरांचे शिल्पचरित्र

googlenewsNext
ठळक मुद्देहा प्रकल्प साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रूपयांचा निधी दिला होताया शिल्पचरित्रामध्ये सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेतमागील दोन - तीन वर्षांपासून तो परिसर सावरकर स्मारकच्या वतीने विकसित करण्यात येत आहे

यशवंत सादूल

सोलापूर : स्वातंत्र्य लढ्यात भारतमातेच्या मुक्तीसाठी आपल्या आयुष्याची तेवीस वर्षे अंदमान, रत्नागिरीसारख्या काळकोठडीत शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सोलापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मार्कंडेय उद्यान येथे विश्वनाथ बेंद्रे आणि अन्य सावरकर भक्तांच्या प्रयत्नाने त्यांचा पुतळा मे १९८६ मध्ये उभारण्यात आला. 

मागील दोन - तीन वर्षांपासून तो परिसर सावरकर स्मारकच्या वतीने विकसित करण्यात येत आहे. सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांची शिल्पे साकारून स्वातंत्र्य चळवळीचा जाज्वल्य इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.

हा प्रकल्प साकारण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी २५ लाख रूपयांचा निधी दिला होता. सावरकर स्मारक समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब आपटे यांनी २५ लाख रूपये, शिक्षण मंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार भाई गिरकर या यांनी प्रत्येकी दहा लाख रूपये, रोहिणी तडवळ, सोलापूर महापालिका यांनी तीस लाखांचा निधी दिलेला आहे.

या शिल्पचरित्रामध्ये सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत. यामध्ये परदेशी कपड्यांची होळी ही घटना आहे. सावरकर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना विदेशी कपड्यांची होळी करण्याच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांची भेट घेतली. स्वातंत्र्य चळवळीत लढणाºया विविध क्षेत्रातील देशभक्तांना एकत्र करून विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली़ सावरकर व टिळक यांच्यासमोर होळीचे चित्र शिल्पातून दाखविण्यात आले आहे.

सावरकरांना पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर बोटीतून फ्रान्समार्गे अंदमानला घेऊन जाताना त्यांनी बोटीतून उडी मारून मातृभूमीला परत येण्यासाठी केलेला प्रयत्न शिल्पातून साकारण्यात आला आहे.

अंदमानमध्ये खडा बेडी, दंडा बेडी, पायात सळईने जखडून ठेवणे असे हाल ब्रिटिशांकडून होत असत. अशा परिस्थितीत असतानाही सुचलेले काव्य कागदावर उतरून ठेवत असत़ त्यालाही मनाई केली जात असे. त्यामुळे कोळशाने, सराटाच्या काड्यांनी भिंतीवर काव्य लिहून ते पाठ करून ठेवत असत़ हा प्रसंग भित्तीशिल्पातून साकारला आहे़ जेलमध्ये दररोज पंचवीस लिटर तेल काढण्याची शिक्षा दिली जात होती. नाहीतर २५ फटके मारले जात होते़ भारतमातेचा जयजयकार केला तरी फटक्यांची शिक्षा दिली जात असे़ हा करूण प्रसंग शिल्पातून दाखविला आहे.

ब्रायटनच्या समुद्र किनाºयावर फिरत असताना मातृभूमीची तीव्र आठवण झाल्याने सुचलेले अजरामर काव्य ‘सागरास’ व ‘जयोस्तुते’ यासारखे काव्य व प्रखर राष्ट्रवादी, विज्ञानवादी विचार शिल्पाच्या रूपात कोरून ठेवलेले आहेत़

प्रणाम भारतमातेस
- स्वातंत्र्योत्तर  काळात भारताच्या प्रगतीमध्ये ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान लाभले अशा राजकारणी, सैन्यदल, तंत्रज्ञान, अंतराळ या व्यक्तींचे भित्तीशिल्पातून दर्शन घडविले आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, सर विश्वेश्वरय्या, डॉ़ होमी भाभा, लालबहादूर शास्त्री, कल्पना चावला, जनरल माणकेशॉ आदींचा समावेश आहे.

पतित पावन मंदिराची स्थापना
- मागासवर्गीय व हिंदू समाजातील वैचारिक दरी दूर करून त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी प्रयत्न सावरकरांनी केले. त्यांना मंदिरात प्रवेश देण्यासोबत रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिराची स्थापना केली.

Web Title: Savarkar's sculpture in the park of Markandeya in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.