घर वाचवा, घर बनवा आंदोलन : रस्त्यावर चूल पेटवून थापल्या भाकऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:25 AM2021-08-28T04:25:54+5:302021-08-28T04:25:54+5:30

बार्शी : येथे अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात जुन्या पोस्ट कार्यालयाच्या रोडलगत असलेल्या नागरिकांनी ...

Save the house, build the house movement: Bread made by lighting a fire in the street | घर वाचवा, घर बनवा आंदोलन : रस्त्यावर चूल पेटवून थापल्या भाकऱ्या

घर वाचवा, घर बनवा आंदोलन : रस्त्यावर चूल पेटवून थापल्या भाकऱ्या

Next

बार्शी : येथे अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात जुन्या पोस्ट कार्यालयाच्या रोडलगत असलेल्या नागरिकांनी घर वाचवा, घर बनवा म्हणत नगरपालिकेच्या गेटसमोर सुमारे तीन तास आंदोलन केले. यावेळी महिलांनी चूल पेटवून भाकऱ्या थापल्या.

या आंदोलनात प्रहार संघटना, स्वराज्य इंडिया, इनक्केडीबल समाजसेवक ग्रुप, मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेचा सहभाग होता. नगरपालिकेने घरे बाधित होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही नोटीस दिल्या नाहीत. बहुमताच्या जोरावर ठराव पास केला, तो जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करावा, मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने त्याचे पुनर्वसन करावे, असे निवेदन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांना देण्यात आले.

यावेळी स्वराज अभियानचे प्रदेशाध्यक्ष मानव कांबळे, प्रहार संघटनेच्या संजीवनी बरंगुळे, मनीष देशपांडे, दीनानाथ काटकर, ॲड. सुहास कांबळे आदी उपस्थित होते.

......

फोटो ओळी

बार्शी नगरपालिकेसमोर घर वाचा, घर बनवा आंदोलन करताना जुन्या पोस्ट कार्यालयात राहणारे नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी.

........

(फोटो २७बार्शी आंदोलन)

Web Title: Save the house, build the house movement: Bread made by lighting a fire in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.