वधू वर परिचय मेळावे घेऊन पैसा अन वेळ वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:27 AM2021-02-17T04:27:33+5:302021-02-17T04:27:33+5:30
मोहोळ : सध्याच्या गतिमान युगात पैसा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे ...
मोहोळ :
सध्याच्या गतिमान युगात पैसा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांनी केले.
मोहोळ येथे महात्मा बसवेश्वर बहुद्देशिय सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या लिंगायत समाजातील वधू वर पालक परिचय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याचे हे १३ वे वर्ष आहे.
नागनाथ सांप्रदायाचे प्रमुख मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत शिवपुजे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भिमाशंकर कुर्डे यांच्या हस्ते स्वागत झाले.
याप्रसंगी लिंगायत समाज मंडळाचे अध्यक्ष अशोक फसके, जंगम समाज मंडळाचे अध्यक्ष सोमेश्वर स्वामी , लिंगायत नेते डॉ.वसंतराव लवंगे, माढयाचे नगरसेवक चंद्रशेखर गोटे, लोखंडे इंजिनियर व्यासपीठावर उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये लिंगायत समाजातील पोटजाती उपजातील १३१ उपवर वधू वरांनी नोंदणी करून स्वत:चा परिचय करून दिला.
याप्रसंगी, भिमाशंकर कुर्डे, सुरेश वाले, संजय विभुते, सुरेश शिवपुजे, सुनिल आंबरे, बापू भडंगे, समाधान कारंडे, डॉ.महेश वाले, महानंदा आंडगे, सुरेश देशमाने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राजाराम कोरे, प्रशांत झाडे, महादेव लामगुंडे, हरीचंद्र बावकर, डिगंबर हेबाळे, अजय कुर्डे, राजाभाऊ कुर्डे, प्रवीण कुर्डे, उमेश कुंभार,विश्वेश्वर विटेकरी, राजेंद्र गोटे, दीपक गवळी, शरद म्हमाने,राजेंद्र वाकळे, चंद्रकांत म्हमाने यांनी परीश्रम घेतले.
---
फोटो : १६ मोहोळ
लिंगायत समाज वधु वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन करताना राजेंद्र खर्गे महाराज, श्रीकांत शिवपुजे , भिमाशंकर कुर्डे , अशोक फसके, सोमेश्वर स्वामी , डॉ.वसंतराव लवंगे आदी