'द' दारुचा नव्हे तर दुधाचा...तरुणांना वाटली 500 दूधाची पाकिटे

By शीतलकुमार कांबळे | Published: December 29, 2022 08:20 PM2022-12-29T20:20:19+5:302022-12-29T20:20:40+5:30

अंनिसतर्फे मोहिम : चला व्यसनला बदनाम करुया उपक्रम

say n to alcohol but milk...500 packets of milk were distributed to the youth in solapur | 'द' दारुचा नव्हे तर दुधाचा...तरुणांना वाटली 500 दूधाची पाकिटे

'द' दारुचा नव्हे तर दुधाचा...तरुणांना वाटली 500 दूधाची पाकिटे

Next

सोलापूर : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी उत्साह असतो.  दारु आणि थर्टी फर्स्ट असे अनेकांसाठी समीकरण असते. यात बदल होण्यासाठी 'द' दारुचा नव्हे तर दुधाचा हा उपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुरूवारी पार्क चौक येथे घेण्यात आला. उपक्रमात तरुणांना दुधाची 500 पाकिटे वाटण्यात आली.

अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या संकल्पनेतून द दारुचा नव्हे दुधाचा या उपक्रमाची सुरुवात झाली. ३१ डिसेंबरला ‘सेलिब्रेशन’च्या नावाखाली युवा पिढीमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक युवक-युवती ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या अधीन होतात. हे ध्यानात घेऊन ‘चला व्यसन बदनाम करूया’ या मोहिमेंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातर्फे गुरुवारी ‘द’ दारूचा नव्हे तर ‘द’ दुधाचा या विषयावर प्रबोधन करण्यात आले.

पोलिस उपायुक्त दिपाली काळे, सरकारी वकिल अॅड इस्माईल पेठकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनिसचे शहराध्यक्ष राजेंद्रसिंह लोखंडे, कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, निशा भोसले, उषा शहा, मधुरा तलवारू, लालनाथ चव्हाण, आर. डी. गायकवाड. व्यंकटेश रंगम, डॉ. अस्मिता बालगावकर,  व्यंकटेश कणकी, डॉ. निलेश गुरव, सरिता मोकाशी, डॉ. निनाद शहा, नितीन अणवेकर, पुंडलिक मोरे, नितीन अणवेकर, सरकारी वकिल अॅड इस्माईल पेठकर आदी उपस्थित होते.

Web Title: say n to alcohol but milk...500 packets of milk were distributed to the youth in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.