'सॉरी' म्हणत चोराने शिक्षिकेच्या गळ्यातील ६० हजाराचे मंगळसूत्र हिसकावले

By रूपेश हेळवे | Published: May 19, 2023 05:18 PM2023-05-19T17:18:49+5:302023-05-19T17:19:30+5:30

या फिर्यादीवरून दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

saying sorry the thief snatched the mangalsutra worth 60000 from the teacher neck | 'सॉरी' म्हणत चोराने शिक्षिकेच्या गळ्यातील ६० हजाराचे मंगळसूत्र हिसकावले

'सॉरी' म्हणत चोराने शिक्षिकेच्या गळ्यातील ६० हजाराचे मंगळसूत्र हिसकावले

googlenewsNext

रूपेश हेळवे, सोलापूर : माजी मंत्र्याच्या वाढदिवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील साठ हजारांचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोघांतील एकाने सॉरी म्हणत त्यांच्या गळ्यातील दागिने हिस्कावले. घटना गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उद्धव नगर येथे घडली. याबाबत सरिता दत्तात्रय अंकुशे ( रा. रेणुका नगर, सैफुल) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दोन अज्ञात तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी अंकुशे या १८ मे रोजी सायंकाळी शाळेचे संस्थापकांच्या एका कार्यक्रमासाठी हुतात्मा सभागृहात गेल्या होत्या. त्या रात्री आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना जुळे सोलापुरातील उद्धव नगर जवळ दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी अचानकच अंकुशे यांच्या गाडीसमोर आपली गाडी अडवी लावली आणि त्यातील एकाने फिर्यादींना स्वाॅरी म्हणत त्यांच्या गळ्यातील २ तोळ्याचे सोन्याचे ६० हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र हिस्कावून नेले. याप्रकरणी त्यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: saying sorry the thief snatched the mangalsutra worth 60000 from the teacher neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.