एस.सी, एस.टी. पदोन्नतीतील आरक्षणसाठी रिपाइंची निदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:17 AM2021-06-04T04:17:44+5:302021-06-04T04:17:44+5:30
सोलापूर : एस.सी, एस.टी. पदोन्नतीतील आरक्षणसाठी रिपाइं (आठवले) गटाच्या वतीने राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात ...
सोलापूर : एस.सी, एस.टी. पदोन्नतीतील आरक्षणसाठी रिपाइं (आठवले) गटाच्या वतीने राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय, राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने ७ मे रोजी जी.आर. काढून त्याला स्थगिती दिली आहे. मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर हा अन्याय आहे. हा जी.आर. रद्द करून पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरवदे यांनी यावेळी दिला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे के.डी. कांबळे, शहर अध्यक्ष अतुल नागटीळक, श्याम धुरी, प्रा. पवन थोरात, सुशील सरवदे, दावला सुर्वे, साई निकंबे, समीर नदाफ, युवक अध्यक्ष सुमित शिवशरण उपस्थित होते.
----
फोटो : ०३ आरपीआय
एस.सी., एस.टी. पदोन्नतीतील आरक्षणसाठी रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करताना राजा सरवदे आणि कार्यकर्ते.