महापालिकेतील शेकडो वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग; जुन्या फाईली वर्गीकरणाचे काम वेगात

By Appasaheb.patil | Published: November 16, 2022 03:23 PM2022-11-16T15:23:30+5:302022-11-16T15:23:46+5:30

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महानगरपालिकेतील रेकॉर्ड वर्गीकरण कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

Scanning of hundreds of years old documents in the Municipal Corporation; Old file classification work faster | महापालिकेतील शेकडो वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग; जुन्या फाईली वर्गीकरणाचे काम वेगात

महापालिकेतील शेकडो वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे होणार स्कॅनिंग; जुन्या फाईली वर्गीकरणाचे काम वेगात

googlenewsNext

सोलापूर : महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महानगरपालिकेतील रेकॉर्ड वर्गीकरण कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी मुख्य लेखापाल रूपाली कोळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेकडो वर्षांपूर्वीचे कागदपत्रे व आवश्यक रेकॉर्ड हे स्कॅनिंग करून कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये जतन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

दरम्यान, महापालिकेतील विविध विभागातील जुन्या रेकॉर्डचे वर्गीकरण युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आवश्यक आणि अनावश्यक अशा पद्धतीने हे वर्गीकरण केले जात असून, आवश्यक रेकॉर्ड हे स्कॅनिंग करून कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये जतन केले जाणार आहे. त्यानंतर डाटा एन्ट्री करून हे सर्व रेकॉर्ड ठेवले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. यासाठी विशेष अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्कॅनिंग करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आल्याचेही महापालिका प्रशासनाने सांगितले. लवकरच सर्व जुने रेकॉर्ड स्कॅनिंग होऊन सोलापूरकरांना ऑनलाइन स्वरूपात पाहायला मिळतील असेही सांगण्यात आले.

लवकरच काम पूर्ण करण्याच्या सूचना

या रेकॉर्डमधून आवश्यक व अनावश्यक अशा दोन पद्धतीत हे रेकॉर्ड वर्गीकरण केले जात आहे. आवश्यक असलेले हे रेकॉर्ड स्कॅनिंग करून कॉम्पॅक्ट डिस्कमध्ये जतन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डाटा एन्ट्री करण्यात येत आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

Web Title: Scanning of hundreds of years old documents in the Municipal Corporation; Old file classification work faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.