जीपच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; सोलापूर शहराजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 11:51 IST2022-12-09T11:50:46+5:302022-12-09T11:51:26+5:30
विकास लोको चव्हाण (राहणार घोडा तांडा दक्षिण सोलापूर) असे मरण पावलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे

जीपच्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू; सोलापूर शहराजवळील घटना
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : शाळेला जाण्यासाठी कुमठे (ता.उ.सोलापूर) या गावाकडे येत असताना एका नववीत शिकणाऱ्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुमठे-मद्रे रोडवर घडली. घटनेनंतर अपघातस्थळी नातेवाईकांनी आक्रोश केला.
विकास लोको चव्हाण (राहणार घोडा तांडा दक्षिण सोलापूर) असे मरण पावलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. विकास चव्हाण हा गाडीवरून कुमठे गावातील शाळेला जात होता. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या जीप गाडीने त्याला जोराची धडक दिली. या अपघातानंतर जीपचालक पळून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेनंतर चव्हाण यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मोठ्या प्रमाणात आक्रोश केला.
या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मृत विकास चव्हाण याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात होत आहे.