सीईओंच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी भरविली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:03+5:302021-02-09T04:25:03+5:30

विजय जाधव व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, शिक्षणाधिकारी व गटविकास अधिका-यांना भेटून अतिक्रमण काढून वर्ग भरण्याबाबत निवेदन दिले ...

School filled with students in front of the CEO's office | सीईओंच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी भरविली शाळा

सीईओंच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी भरविली शाळा

Next

विजय जाधव व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, शिक्षणाधिकारी व गटविकास अधिका-यांना भेटून अतिक्रमण काढून वर्ग भरण्याबाबत निवेदन दिले होते. त्याची दखल वरिष्ठांनी घेतली.

विस्तार अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार अतिक्रमण करून १४ गाळे उभारल्याने शाळेचा रस्ता बंद झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी मुख्याध्यापकांना पोलीस मदत घेऊन अतिक्रमण काढा, असे लेखी पत्र दिले.

तरीही शाळेचा रस्ता बंद असल्याने सोमवारी ६० मुले जिल्हा परिषदेत धडकली. या मुलांनी सीईओंच्या दालनाबाहेर ठिय्या मांडून अभ्यास सुरू केला. ही बाब सीईओंना समजल्यानंतर त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी राठोड, गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांच्याशी चर्चा करून सोबत आलेल्या पालकांना सीईओंनी बोलावून घेतले. दोन दिवसात टास्क फोर्स लावून अतिक्रमण काढण्यात येईल, असे लेखी पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व शिक्षणाधिकारी राठोड यांच्या सहिने दिले.

अतिक्रमण काढून शाळा सुरू करण्याच्या घोषणा

तिर्हे शाळेतील ६० मुले-मुलींना पालकांनी दप्तरासह वाहनाने घेऊन आले होते. यावेळी मुलांनी अतिक्रमण काढून शाळा सुरू करण्याच्या घोषणा दिल्या.

फोटो

मिलिंद राऊळ यांच्याकडून येणार आहेत.

Web Title: School filled with students in front of the CEO's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.