विहाळमध्ये भरली झाडाखाली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:39+5:302021-07-04T04:16:39+5:30
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून वेगवेगळे उपक्रम राबविले जात ...
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. विहाळ शाळेचे मुख्याध्यापक सतीश कांबळे व शिक्षिका वैष्णवी आव्हाड हे विद्यार्थी शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत.
या पार्श्वभूमीवरच कोरोना अनुषंगाने खबरदारी घेऊन झाडाखालची शाळा भरवीत विद्यार्थ्यांना अध्यापन केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत अभ्यास पूर्ण केला.
याप्रसंगी केंद्रप्रमुख दत्तात्रय खाटमोडे यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांची नियमित शाळा बंद आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहण्यासाठी ऑनलाइन शिक्षणासह विविध उपक्रमांतून प्रयत्न करीत आहोत. त्यातूनच कोरोनाविषयक काळजी घेऊन झाडाखालची शाळा भरविली. विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मुख्याध्यापक कांबळे यांनी सांगितले.
०३करमाळा-विहाळ स्कूल
फोटो ओळी : विहाळ येथील प्राथमिक शाळेसमोरील वडाच्या झाडाखाली शाळा भरली आहे.