शैक्षणिक शुल्कात ५० % सवलत देणारी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:16 AM2021-07-15T04:16:42+5:302021-07-15T04:16:42+5:30
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून शाळेने शुल्कात निम्मी सवलत दिल्याने पालकांना फार मोठा आधार मिळाला आहे. विद्यार्थ्यांची कोरोना काळापूर्वीची ...
विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून शाळेने शुल्कात निम्मी सवलत दिल्याने पालकांना फार मोठा आधार मिळाला आहे. विद्यार्थ्यांची कोरोना काळापूर्वीची फी येणे बाकी असतानाही समाजमन आणि परिस्थितीची जाणीव ठेवत सरपंच उमेश पाटील यांनी सर्वच मुलांना सरसकट ५० टक्के फी माफ करून दिलासा दिला आहे; मात्र ही सवलत फक्त ऑनलाइन शिक्षण काळापुरती मर्यादित असणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या काळात चपळगाव पंचक्रोशीतील ५०१ कुटुंबांना मोफत धान्य दिले होते. तसेच पूरग्रस्तांना १ लाख २१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. चपळगावच्या आरोग्य केंद्रात स्वखर्चाने जलशुद्धीकरण मशीन भेट देत उमेश पाटील यांनी सामाजिक आरोग्य जपले आहेत. यानंतर पालकांची आर्थिक अडचण ओळखून गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी शुल्कात ५० टक्क्यांची सवलत देऊन आधार दिला आहे. (वा. प्र.)
---
140721\img-20210226-wa0097.jpg
चेअरमन उमेश पाटील यांचा फोटो