पंढरपुरातील किलोमीटरचा परिसर सील; बाजातपेठ केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:11 AM2020-05-28T10:11:01+5:302020-05-28T10:11:26+5:30
कोरोनाग्रस्त आढळल्याने घेतली खबरदारी; पोलीस बंदोबस्तही वाढविला...!
पंढरपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला परिसरालगतचा एक किलोमीटरचा भाग गुरुवारी पहाटेपासून सील करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुरातील व्यापारी पेठ व बाजार बंद झाला.
मुंबईहून दोन नागरिक पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरात आले होते. त्यांना एका खाजगी शिक्षण संस्थेत मध्ये संस्थात्मक करण्यात आले होते. ते दोघे संस्थात्मक कॉरंटाईन असताना त्यांचे नातेवाईक जेवणा डब्बा पुरवीत होते.
ते दोघे कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरातील चारही बाजूचा एक किलोमीटर परिसरात सील करण्यात येत आहे.
पोलीस प्रशासनाने आंबेडकर चौक, शिवाजी चौक, अर्बन बँक चौक, सावरकर चौक व सरगम चौका मध्ये बेरीकटिंग लावली आहे. त्याचबरोबर त्या परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू आहे.
ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीच्या आजूबाजूलाच विविध प्रकारचे दुकाने आहेत. त्याचबरोबर भाजी मंडई, किराणा दुकाने, कपड्यांची दुकाने व शेतीची अवजारे विक्री करणारे दुकाने आहेत. या परिसरात नागरिकांना ये-जा करण्यास निर्बंध केले आहेत. यामुळे पंढरपुरातील बाजार बंद राहणार आहे.