तीस दिवसांसाठी पाच दुकाने केली सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:04+5:302021-04-07T04:23:04+5:30
सांगोला शहरातील अनेक दुकानदारांनी फिजिकल डिस्टन्स, मास्क व दुकानातील गर्दीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. कचेरी रोडवरील इलेक्ट्रॉनिक दुकान, किराणा, चहा ...
सांगोला शहरातील अनेक दुकानदारांनी फिजिकल डिस्टन्स, मास्क व दुकानातील गर्दीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. कचेरी रोडवरील इलेक्ट्रॉनिक दुकान, किराणा, चहा दुकान, वासूद रोडवरील कुटुंब सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही व्यापाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नगरपालिका, महसूल व पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत ही पाच दुकाने सील केली, तसेच दुचाकीस्वार, व्यापारी, विक्रेत्यांनी तोंडाला मास्क न लावल्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे.
व्यापारी, नागरिक संभ्रमात
राज्य सरकारने ४ एप्रिलच्या आदेशात ५ एप्रिल रोजी सुधारणा केल्याने व्यापारी, नागरिक मात्र मंगळवारी सकाळपासूनच संभ्रमात होता. सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू केल्याने सर्वसामान्य नागरिकांपासून हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांपर्यंत संभ्रम निर्माण झाला आहे. बाजारपेठा, दुकाने, व्यापारी, पानटपरी, गॅरेज, ऑटोमोबाइल दुकाने, असे अनेक घटक कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीबाबत पूर्णतः गोंधळात असून, व्यापारी वर्गातून नाराजीचा सूर आहे.