करमाळ्यात थकबाकी न भरल्याने दहा गाळे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:22 AM2021-03-25T04:22:00+5:302021-03-25T04:22:00+5:30

यामध्ये कै. ना. म. जगताप शॉपिंग सेंटरमधील ५ व अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर मधील ५ गाळे असे एकूण १० ...

Seal ten floors due to non-payment of arrears in Karmala | करमाळ्यात थकबाकी न भरल्याने दहा गाळे सील

करमाळ्यात थकबाकी न भरल्याने दहा गाळे सील

Next

यामध्ये कै. ना. म. जगताप शॉपिंग सेंटरमधील ५ व अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर मधील ५ गाळे असे एकूण १० गाळे सील करण्यात आले आहेत. अश्विनी पाटील, सहायक मिळकत व्यवस्थापक दत्तात्रय बदे, सहाय्यक कर निरीक्षक मल्हारी चांदगुडे, स्वाती माने, गजानन राक्षे, दत्ता घोलप, राजेंद्र झाडबुके, अभय देशपांडे यांच्या वसुली पथकाकडून ही थकबाकीदार गाळे सीलची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील थकबाकीदार मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन ही बंद करण्यात येत आहेत.

सध्या नगर परिषदेने मालमत्ता कर वसुलीकरिता चार पथके, गाळा भाडे वसुलीकरता एक पथक तर पाणीपट्टी वसुली करता तीन पथके नियुक्त केली आहेत. तसेच मार्चअखेर असल्याने नगर परिषद कार्यालयातील वसुली विभाग शनिवार, रविवार कार्यालयीन सुट्यांच्या दिवशीही सुरू आहे. करमाळा नगर परिषदेच्या गाळेधारकांकडील थकबाकींसह एकूण सुमारे ५२ लाख ५० हजार ३ रुपयांपैकी ३६ लाख ५९ हजार ४० रुपयांची गाळाभाडे वसुली झाले आहे. तसेच मालमत्ताधारकांकडून थकबाकीसह एकूण घरपट्टी सुमारे ३ कोटी ५१ लाख रुपयांपैकी २ कोटी २२ लाख रुपयांची वसुली झाली आहे, तरी उर्वरित गाळेधारकांनी व मालमत्ताधारकांनी आपल्याकडील गाळेभाडे व घरपट्टी नगर परिषदेकडे भरून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी वीणा पवार यांनी केले आहे.

फोटो

२४करमाळा-वसुली

ओळी : करमाळ्यातील थकबाकी वसुलीसाठी गाळा सील करताना नगर परिषदेचे वसुली पथक.

Web Title: Seal ten floors due to non-payment of arrears in Karmala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.