तिरंगी लढतीवर शिक्कामोर्तब; एकमेव जेऊरवाडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:37+5:302021-01-08T05:11:37+5:30
जेऊरवाडी ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागातील सात जागेसाठी सातच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानुसार जयश्री शिरसकर, कल्पना निमगिरे, माया निमगिरे, लता ...
जेऊरवाडी ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागातील सात जागेसाठी सातच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानुसार जयश्री शिरसकर, कल्पना निमगिरे, माया निमगिरे, लता निमगिरे, तात्यासाहेब निमगिरे, गोरख निमगिरे, योगेश निमगिरे हे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.
तालुक्यात पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, घारगाव, हिवरवाडी, वडगाव,भोसे, पिंपळवाडी, उमरड, शेटफळ, कुगाव, केडगाव, पांडे, अर्जुननगर, मिरगव्हाण, फिसरे, करंजे, बोरगाव, श्रीदेवीचामाळ, दिलमेश्वर, कोळगाव, हिवरे, हिसरे, निमगाव ह, गुळसडी, सरपडोह, कोेंढेज, कुंभेज, झरे, देवळाली, शेलगाव-क, साडे, सालसे, सौंदे, पाथुर्डी, नेरले, आळसुुदे, पांगरे, सांगवी, कविटगाव, ढोकरी, मांगी, जातेगाव, पुनवर, वडगाव, आळजापूर, बिटरगाव-श्री, पोथरे, सावडी, रोसेवाडी या गावात निवडणुका लागल्या आहेत.
प्रतिष्ठा पणाला..
मांगी हे माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांची ग्रामपंचायत असून, स्व. बागल असताना ही ग्रामपंचायत बिनविरोध होत असे; पण गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून बिनविरोधाची परंपरा खंडित झाली आहे. मांगी ग्रामपंचायतीमध्ये आ. संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुजित बागल यांनी पॅनेल उभा केला आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत देवळाली ग्रामपंचायत बागल गटाकडून खेचून घेणाऱ्या पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांना या निवडणुकीत बागल गटाने अव्हान दिले आहे.
फोटो ओळी: ०४करमाळा
करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरीस कार्यकर्ते व उमेदवारांच्या वाहनांचा ताफा व जमलेली गर्दी.
----