चारा वाटपासाठी सोलापूर जिल्ह्यात बियाणांचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:51 PM2019-02-07T14:51:18+5:302019-02-07T14:52:48+5:30

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकºयांकडे चारा उत्पादन करण्यासाठी पाणी आहे त्यांना शासनाने बियाणे देण्याचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात हाती ...

Season's drought in Solapur district for allocation of fodder | चारा वाटपासाठी सोलापूर जिल्ह्यात बियाणांचा दुष्काळ

चारा वाटपासाठी सोलापूर जिल्ह्यात बियाणांचा दुष्काळ

Next
ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकºयांकडे चारा उत्पादन करण्यासाठी पाणी आहे त्यांना शासनाने बियाणे देण्याचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात हाती घेतलाया योजनेतून ९७ कोटी रुपयांचे बियाणे वाटप करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकºयांकडे चारा उत्पादन करण्यासाठी पाणी आहे त्यांना शासनाने बियाणे देण्याचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात हाती घेतला. या योजनेतून ९७ कोटी रुपयांचे बियाणे वाटप करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात एका शेतकºयास केवळ पाच किलोच बियाणे देण्यात आले आहेत, प्रत्येक गावात केवळ फोटोसेशनपुरतेच कार्यक्रम झाल्याची प्रतिक्रिया जि.प. सदस्य भारत शिंदे यांनी दिली.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्य शासनाने शेतकºयांना चारा लागवडीसाठी बियाणे मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकºयांनी कृषी खात्याकडे अर्ज दाखल केले होते. शेतकºयास उपलब्ध असलेल्या पाण्याच्या सुविधेनुसार त्याच्या क्षेत्रानुसार बियाणे देण्याचा नियम असताना सरसकट सर्वच शेतकºयांना केवळ पाच किलोची एकच पिशवी देण्यात आल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील शेतकºयांकडून करण्यात येत आहेत. 

राज्य शासनाच्या नेहरू नगर येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती स्तरावरील तालुका पशुवैद्यकीय अधिकाºयांना बियाणे देण्यात आले होते. तालुका अधिकाºयांनी सहायक पशुधन विकास अधिकारी यांना बियाणे शेतकºयांना वाटप करण्यासाठी दिले आहेत. 
ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील महिन्यातच बियाणांचा पुरवठा झाला. मात्र प्रत्येक गावातील प्रति शेतकºयास पाच किलोच बियाणे देण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अजूनही काही दवाखान्यात बियाणे पडून असून या बियाणांचा करणार तरी काय, असा प्रश्न शेतकºयांतून उपस्थित होत आहे.

कसले बियाणे.. कोणते बियाणे... : तानवडे
- याबाबत जि.प. पक्षनेता आनंद तानवडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कसले बियाणे वाटप झाले. कोणते बियाणे वाटप झाले. कधी झाले असा उलट प्रश्न उपस्थित केला. आपल्या मतदारसंघात तरी असा कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम झाला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
सगळ्यांना देणे शक्य नाही, ज्यांना पाणी आहे, त्यांना मिळतील : डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ
च्बियाणांसाठी शेतकºयांची एकाचवेळी मागणी जास्त होती. त्यामुळे मागणी केलेल्या अनेक शेतकºयांना चारा उत्पादन करण्यासाठी त्यांना पाच किलो बियाणे देण्यात आले आहेत. काही शेतकºयांकडे पाणी अजूनही उपलब्ध असल्यास, त्याबाबत खात्री करून त्यांना पुन्हा अधिक बियाणे देण्यात येतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ यांनी दिली. 

केवळ बियाणे वाटपाचा फार्स : भारत शिंदे
चारा उत्पादनासाठी शेतकºयांना बियाणे देण्यात आल्याचे नेहमीच अधिकाºयांकडून बैठकीत सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक तालुक्यात ठराविक गावात ठराविक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत फोटोसेशनपुरतेच बियाणे वाटप कार्यक्रम झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होणे गरजेचे असून, शेतकºयांना शासनाकडून आलेले सर्व बियाणे मिळणे अपेक्षित आहे, असे मत जि.प. सदस्य भारत शिंदे यांनी व्यक्त केले.

Web Title: Season's drought in Solapur district for allocation of fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.