‘पांडुरंग’चा १३१ रुपयांचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:15 AM2021-07-09T04:15:39+5:302021-07-09T04:15:39+5:30

श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून ...

The second installment of ‘Pandurang’ of Rs | ‘पांडुरंग’चा १३१ रुपयांचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग

‘पांडुरंग’चा १३१ रुपयांचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग

Next

श्रीपूर (ता. माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याने १० लाख ६ हजार ७७० मे. टन ऊस गाळप करून ११.४४ टक्के सरासरी साखर उताऱ्याने ११ लाख १३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन उद्दिष्टपूर्ती केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असताना पांडुरंग कारखान्याने मात्र गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसास दुसरा हप्ता १३१ रुपये प्रतिटनाप्रमाणे दिल्यामुळे शेतकऱ्यांना हंगाम पूर्व मशागतीची कामे करण्यासाठी मदत होणार आहे.

गळीत हंगाम २०२१-२२ साठी कारखान्याकडे जवळपास १४ हजार हेक्टर उसाची नोंद झाली असून, यामधून ११ ते १२ लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. गळीत हंगाम २०२१-२२ सुरू करण्याच्या दृष्टीने कारखान्यामधील कामे प्रगतिपथावर असून, ती लवकरच पूर्ण होऊन गाळप हंगाम वेळेवर सुरू केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी तोडणी व वाहतूक यंत्रणा सक्षमपणे उभारली आहे.

Web Title: The second installment of ‘Pandurang’ of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.