कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दूध ३० रुपयांवरून २१ रुपये लीटरवर आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:23 AM2021-05-21T04:23:35+5:302021-05-21T04:23:35+5:30
दुधाचा खरेदी दर लॉकडाऊनमुळे २१ रुपये होतो, मग दूध पिशवीचा दर ५० रुपयेच कसा राहतो, असा सवाल दूध उत्पादकातून ...
दुधाचा खरेदी दर लॉकडाऊनमुळे २१ रुपये होतो, मग दूध पिशवीचा दर ५० रुपयेच कसा राहतो, असा सवाल दूध उत्पादकातून विचारला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दूध उत्पादकावर संकट कोसळले आहे. दूध उत्पादनासाठी प्रतिलीटर ३० ते ३२ रुपये खर्च येतो, त्यामुळे दूध उत्पादकांना लीटरमागे १० ते ११ रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.
दुधाची एक गाय सांभाळण्यासााठी घास, कडवळ, गाळीपेंड, सरकीपेंड यासाठी दररोज ३०० रुपये खर्च येतो. ती गाय सरासरी १५ ते १६ लीटर दूध देते उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घातला तर दहा-पंधरा रुपयेसुद्धा पदरात पडत नाहीत. मग नुसत्या शेणावर दुधाचा धंदा करण्याची वेळ दूध उत्पादकावर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे मात्र डेअरीवाले दूध पिशवी प्रतिलीटर ५० यपये किमतीनेच ग्राहकांना विक्री करत आहेत हे विशेष.
----
दूध दर कमी झाल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी कुठे परिस्थिती सुधारली होती; पण पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण देत दुधाचे दर कमी करण्यात आले आहेत. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ जुळत नसल्याने दूध धंदा परवडत नसल्याने बंद करण्याची वेळ आली आहे.
- कैलास पवार, दूध उत्पादक हिवरवाडी.
----