दुस-या लाटेत शहरापेक्षा ग्रामीणमध्ये दुप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:21+5:302021-05-05T04:36:21+5:30
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आजपर्यंत ग्रामीण भागात एकूण रुग्णसंख्या ५६९ इतकी असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आजपर्यंत ग्रामीण भागात एकूण रुग्णसंख्या ५६९ इतकी असून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. २२५ रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. ५१ रुग्णांवर सोलापूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे तसेच शहरी भागात १९४ रुग्ण असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ३४ जणांवर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. ३० रुग्णांवर सोलापूर येथील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. असे एकंदरीत शहरीपेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्या, मृत्यू दुपटीने वाढ झाली आहे.
शहरी लोक वृत्तपत्र, टीव्ही, सोशल मीडिया, फेसबुक आदींच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे स्वतः बदल करून घेऊन कोरोनचे सर्व नियम नियमितपणे पाळत आहेत. याउलट ग्रामीण लोक आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी काळजी घेण्यासाठी व आजार वाढू नये, लस घ्या असे सांगण्यासाठी गेले असता त्यांना प्रतिसाद देत नाहीत. अंगावर आजार काढत आहेत.
ग्रामीणमध्ये लग्नसोहळे सुरूच
ग्रामीण भागात आजही अंत्यविधी, लग्नकार्य, यात्रा मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक ठिकाणी शेकडोने गर्दी होत आहे. त्यात काहीही बदल केलेले दिसत नाही. पोलीस ठाण्याकडून केवळ २५ लोकांना लग्नासाठी परवानगी दिली असली तरी शेकडो लोक एकत्र जमतात. पोलीस सर्वच ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे दिसून येते.
कोट::::
अजूनही ग्रामीण लोक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. आजार अंगावर काढत आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांना दाद देत नाहीत. अनेक ठिकाणी बेछूट बोलणे, अंगावर धावून येणे अशाप्रकारचे घटना घडत आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे तसेच डॉक्टरांचे सल्ल्याने औषध उपचार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. आश्विन करजखेडे,
तालुका आरोग्य अधिकारी