दुसऱ्या लाटेत पोलिसांकडून ३२०१ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:24 AM2021-04-28T04:24:02+5:302021-04-28T04:24:02+5:30

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेगाने प्रादुर्भाव सुरू आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य पार पाडत ...

In the second wave, police took action against 3201 people | दुसऱ्या लाटेत पोलिसांकडून ३२०१ जणांवर कारवाई

दुसऱ्या लाटेत पोलिसांकडून ३२०१ जणांवर कारवाई

Next

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेगाने प्रादुर्भाव सुरू आहे. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य पार पाडत आहेत तरीही बहुतांशी लोक, तरुण कोरोनाच्या संसर्गाला गांभीर्याने न घेता शासनाच्या आदेशाचा भंग करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी तोंडाला मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे अशा ३१५६ केसेस करून १३ लाख ९५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहनधारकांकडून १० हजार, व्यापाऱ्यांनी निर्धारित वेळेत दुकान बंद न केल्याने ५३ केसेस करून २८ हजार ५०० रुपयांचा दंड तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५८ दुचाकी जप्त केल्या. शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ परमिट रूम व १ देशी दारू दुकानदारावर गुन्हा दाखल करून सील केले.

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या ९ जणांवर गुन्हे दाखल करून अटक तर ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त लोक जमवून लग्नकार्यात मिळून आल्याने १० जणांवर गुन्हे दाखल करून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

शहर व तालुक्यात कोणीही व्यक्ती विनाकारण फिरताना मिळून आल्यास व त्याच्याकडे कोविड चाचणी प्रमाणपत्र नसेल तर त्याची त्याचठिकाणी कोविड चाचणी केली जाईल. चाचणीत तो पॉझिटिव्ह मिळून आल्यास त्याची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी केली जाईल.

- भगवानराव निंबाळकर

पोलीस निरीक्षक, सांगोला

Web Title: In the second wave, police took action against 3201 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.