दुसऱ्या वर्षीही गुरू-शिष्यांच्या भेटीची परंपरा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:29+5:302021-07-24T04:15:29+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या २५ मार्चपासून स्वामींचे वटवृक्ष मंदिर पुन्हा बंद झाले. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा, धार्मिक ...

In the second year also, the tradition of Guru-Shishya meeting was broken | दुसऱ्या वर्षीही गुरू-शिष्यांच्या भेटीची परंपरा खंडित

दुसऱ्या वर्षीही गुरू-शिष्यांच्या भेटीची परंपरा खंडित

googlenewsNext

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या २५ मार्चपासून स्वामींचे वटवृक्ष मंदिर पुन्हा बंद झाले. मंदिरातील स्वामींचे नित्योपचार, नित्यक्रम, पूजाअर्चा, धार्मिक विधी हे नियमितपणे चालू आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वटवृक्ष मंदिरात पहाटे पाच वाजता पुरोहित मोहन पुजारी यांच्या मंत्रोच्चारात स्वामींची काकड आरती झाली. सकाळी ११ वाजता महानैवेद्य आरती मंदार पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

याप्रसंगी सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करण्यात आले. आरतीनंतर मंदिर बंद करून गाभारा मंडपाचे प्रवेशद्वारही त्वरित बंद करण्यात आले.

-----

स्वामीभक्तांच्या मनात असलेल्या गुरुस्थानामुळे वटवृक्ष मंदिरातील गुरूपौर्णिमेस दरवर्षी अनेक स्वामीभक्त स्वामींच्या भेटीसाठी येत असतात. परंतु यंदाही गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तास कोरोना लॉकडाऊनमुळे स्वामींनाच गुरू मानणाऱ्या भाविक शिष्यांना यंदाही स्वामी दर्शनास मुकावे लागले आहे. या संकटामुळे यंदा गुरू-शिष्य भेटीची परंपरा दुसऱ्यांदा खंडित झाली आहे.

- महेश इंगळे, चेअरमन स्वामी समर्थ मंदिर समिती, अक्कलकोट

फोटो ओळ - गुरूपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची प्रसन्न भावमुद्रा व आरतीप्रसंगी महेश इंगळे.

Web Title: In the second year also, the tradition of Guru-Shishya meeting was broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.