सलग दुसऱ्या वर्षी शिवभक्तांना कोरोनाची आडकाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:23 AM2021-04-07T04:23:00+5:302021-04-07T04:23:00+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या वार्षिक यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकणसह राज्यभरातून सुमारे ७ ते ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या वार्षिक यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकणसह राज्यभरातून सुमारे ७ ते ८ लाख भाविक येतात. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने सण, समारंभ, गर्दीचे कार्यक्रम, मेळावे यासह यात्रा-जत्रांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यात्रा रद्द करण्याच्या दृष्टीने शिंगणापूर ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते.
बंद यात्रेसाठी प्रशासनाची तयारी
१७ ते २७ एप्रिल दरम्यान यात्रा कालावधीतील सर्व धार्मिक विधी स्थानिक सेवाधारी व मानकऱ्यांमार्फत होणार आहेत. बाहेरून येणाऱ्या भाविकांना शिंगणापूरमध्ये येण्यास प्रतिबंध,
गावामध्ये येणारे सर्व रस्ते सील करण्यात येणार,
यात्रा कालावधीत शिंगणापूरमध्ये जमावबंदी आदेश लागू,
परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त,
शंभू महादेव मंदिर ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.