बार्शी मर्चंट असोच्या अध्यक्षपदी कथले, सचिव महेश करळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:04+5:302021-06-09T04:28:04+5:30
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष दिलीप गांधी, सहसचिव राहुल मुंढे, खजिनदार अनिल गायकवाड व तंटे निवड समितीच्या अध्यक्षपदी शिवशंकर बगले यांची ...
अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष दिलीप गांधी, सहसचिव राहुल मुंढे, खजिनदार अनिल गायकवाड व तंटे निवड समितीच्या अध्यक्षपदी शिवशंकर बगले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी पुढील ३ वर्षांच्या कालावधीकरिता करण्यात आल्या.
बाजार समितीच्या सौदे हॉलमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष कुंडलिकराव गायकवाड, बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, चंद्रकांत मांजरे, मावळते अध्यक्ष दामोदर काळदाते, मैनुद्दीन तांबोळी, बापूसाहेब नाकाडे, सचिन मडके, भरतेश गांधी, नगरसेवक प्रशांत कथले, बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे, तुकाराम माने व व्यापारी बांधव उपस्थित होते.
कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून भारत कोटेचा, मल्लिनाथ गाढवे, मनोहर सोमाणी, सुनील ढाळे, विजय लोमटे, अमर मारडकर, मैनुद्दीन तांबोळी, दीपेश भानुशाली, दीपक शिंदे या १० जणांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित सोनिग्रा यांनी केले. आभार सचिव महेश करळे यांनी मानले.
----
===Photopath===
070621\fb_img_1623065317282__02.jpg
===Caption===
बार्शी मर्चंट असोची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली. छायाचित्रार अध्यक्षपदी बाबासाहेब कथले, उपाध्यपदी दिलीप गांधी तर सिचव महेश करळे यांच्यासह पदाधिकारी.