कॉलेजमधील तरूणीला फूस लावून पळवून नेले; अपहरणाचा गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Updated: July 19, 2023 18:56 IST2023-07-19T18:56:23+5:302023-07-19T18:56:32+5:30
यातील पिडित मुलगी अल्पवयीन असून, एका महाविद्यालयात ती इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे.

कॉलेजमधील तरूणीला फूस लावून पळवून नेले; अपहरणाचा गुन्हा दाखल
सोलापूर : कॉलेजला जाते म्हणून गेलेली मुलगी घर परत आली नाही. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पडित मुलीच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिल्याने बुधवारी अपहरणाचा गुन्हा नोंदला आहे. यातील पिडित मुलगी अल्पवयीन असून, एका महाविद्यालयात ती इयत्ता बारावीचे शिक्षण घेत आहे.
तिची आई टेलरिंगचा व्यवसाय करुन उपजीविका भागवते. पतीही मजुरी करतात. मुलगी १५ जुलै रोजी सकाळी ११ च्या सुमारास कॉलेजला जाते म्हणून गेली ती परत आली नाही. आईवडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु सापडली नाही. काही महिन्यापूर्वी सांगोला तालुक्यातील एक स्थळ मुलीला पाहण्यासाठी आले होते. कोणीतरी फूस लावून तीला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्ररणी तपास फौजदार गायकवाड करीत आहेत.