मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनीही सोडला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:37 AM2021-05-05T04:37:14+5:302021-05-05T04:37:14+5:30
सोलापूर : कोरोना अन् त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. रविवारी उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू ...
सोलापूर : कोरोना अन् त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. रविवारी उपचार सुरू असताना दोघांचा मृत्यू झाला. परवा ३८ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनीही जीव सोडला. बीबीदारफळ-सावंतवाडीत चार दिवसांत सहा लोक मरण पावले.
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीलाच आरोग्य केंद्रात लक्षणे असलेल्यांना बोलावून तपासणी केली होती. गावातील डाॅ. अभिजित साठे, श्रीहरी देशमुख व डाॅ. अमित भोसले यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या संशयितांची रॅपीड तपासणी करून कोरोना सेंटरला पाठविले होते. आम्हांला काहीच त्रास होत नाही असे क्वाॅरंटाईन केलेले म्हणातात. मात्र, बाधित संख्या थांबली होती.
यावर्षी याकडे लक्ष दिले नसल्याने कोरोबाधित व मृत्यू होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
एप्रिल महिन्यात कोरोना, हदयविकार व वृद्धापकाळाने ३० लोक मरण पावले. मे महिन्यातही मृत्यूचे तांडव थांबले नाही. परवा सावंतवाडीच्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनीही जीव सोडला. मंगळवारी पुन्हा एकाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला.
--
सेंटर सुरू झाले नाही
गटविकास अधिकारी महादेव बेळळे व तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी कळमण, नान्नज, मार्डी, वडाळा व बीबीदारफळ येथे कोरोना सेंटर करण्यासाठी बैठका घेतल्या. १ मे पासून पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात कोरोना सेंटर सुरू होतील असे सांगण्यात आले होते. मात्र, एकही केंद्र सुरू झाले नाही.