लसीकरणासाठी रांगा पाहून काहींनी घेतला काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:16 AM2021-06-24T04:16:38+5:302021-06-24T04:16:38+5:30

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने लसींच्या तुटवड्यामुळे या गटाच्या लसीकरणाला ...

Seeing the queues for vaccinations, some took off their legs | लसीकरणासाठी रांगा पाहून काहींनी घेतला काढता पाय

लसीकरणासाठी रांगा पाहून काहींनी घेतला काढता पाय

Next

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाने लसींच्या तुटवड्यामुळे या गटाच्या लसीकरणाला स्थगिती दिल्यानंतर लसीकरणाचा बोजवारा उडाला होता. दरम्यान, केंद्र शासनाने लसीकरण नियमात बदल करत मंगळवारपासून १८ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बुधवारी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, मरवडे, सलगर, आंधळगाव, भोसे या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था केली होती. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० व ग्रामीण रुग्णालयात २०० प्रमाणे मिळालेल्या ७०० डोसपैकी ६१४ जणांचे लसीकरण करण्यात आले. बुधवारी १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना गोंधळ उडणार नाही, याची काळजी आरोग्य प्रशासनाने घेतली. सध्या कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्याने लस दिली जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांनी सांगितले.

यासाठी डॉ. नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी प्रमोद शिंदे, डॉ. धनंजय सरोदे, डॉ. दत्तात्रय शिंदे, डॉ. संजय कांबळे, डॉ. वर्षा पवार, डॉ. भीमराव पडवळे, डॉ. श्रीपाद माने, फार्मसी ऑफिसर सी. वाय. बिराजदार, हणमंतराव कलादगी, विस्ताराधिकारी प्रदीपकुमार भोसले, आरोग्यसेवक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची कडक अंमलबजावणी केली.

फोटो ओळी :::::::::::::::

आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावरील लसीकरणप्रसंगी डॉ. दत्तात्रय शिंदे.

Web Title: Seeing the queues for vaccinations, some took off their legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.