राखी बांधून परतणा-या बहिणीचे भावादेखत बसमधून गंठण पळवलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:42+5:302021-08-28T04:26:42+5:30
करमाळा : राखी बांधून भावासाेबत सासरी निघालेल्या बहिणीचे एस.टी. प्रवासात सोन्याचे एक तोळ्याचे गंठण पळविले. करमाळा बसस्थानकावर ...
करमाळा : राखी बांधून भावासाेबत सासरी निघालेल्या बहिणीचे एस.टी. प्रवासात सोन्याचे एक तोळ्याचे गंठण पळविले. करमाळा बसस्थानकावर उतरताच गंठण पळविल्याचा प्रकार निदर्शनास आला.
याप्रकरणी भाऊ आकाश लक्ष्मण गंगावणे (वय १९, रा. गुरवपिंपरी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गंगावणे यांची बहीण कोमल अविनाश गायकवाड (रा. शिंगेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) ही रक्षाबंधनासाठी माहेरी आली होती. रक्षाबंधनाचा सण आटोपून २५ ऑगस्टला दुपारी दीड वाजता ती माहेरी निघाली. तिला घरी सोडण्यासाठी अहमदनगर येथून सोलापूर एस.टी. बसने भाऊदेखील सोबत निघाला होता. गर्दी असल्याने कोमलने गळ्यातील सोन्याचे गंठण काढून पर्समध्ये ठेवले होते. एसटी बस करमाळा बसस्थानकावर थांबली आणि खाली उतरून फलाट क्रमांक चारवर बसले. दरम्यान, बहिणीची पर्स ही तिच्याजवळच होती. त्यावेळी ती एस.टी. बस कधी आहे याबाबत भावाला चौकशी करायला सांगितले असता तो चौकशी करायला गेला. इतक्यात चोरट्याने पर्स पळविली. या पर्समध्ये ४३ हजारांचे एक तोळ्याचे सोन्याचे गंठण होते.