तज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्या जेरबंद करा; विजयकुमार देशमुखांनी दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 09:56 PM2021-08-02T21:56:28+5:302021-08-02T22:01:01+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Seize leopards by summoning expert officers; Suggestions given by Vijaykumar Deshmukh | तज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्या जेरबंद करा; विजयकुमार देशमुखांनी दिल्या सूचना

तज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्या जेरबंद करा; विजयकुमार देशमुखांनी दिल्या सूचना

Next

सोलापूर - सोलापूर शहरामध्ये २७ जुलै रोजी मौजे कोंडी परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी आढळला होता. याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी हे घटनास्थळी धाव घेत त्या परिसराची पाहणी केली व बिबट्याचे पाऊलखुणा आढळल्या होत्या त्यावरून वन विभागाने पाहणी करून ट्रॅप लावण्यात आला होता व तेथील नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.

आज सोमवारी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कोंडी येथे घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी केली. एमआयडीसी भागामध्ये नागरिक कामासाठी ये-जा करत असतात आणि याभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहेत. त्याभागामध्ये अजून ट्रॅप लावण्याची गरज आहे अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन बिबट्या पकडण्याचा प्रयत्न करावा आणि तज्ञ अधिकाऱ्यांना बोलावून बिबट्या जेरबंद करण्याच्या सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिल्या.

कोंडी येथे एमआयडीसी एरिया आहे तेथे येणाऱ्या कामगारांनी आणि त्याभागात राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर रात्रीच्या वेळेला जातां हातामध्ये टॉर्च असावी आणि एकट्याने कुठेही फिरू नये. कोणीही घराबाहेर शौचालयास जाऊ नये घराबाहेर रात्रीचे झोपू नये. लहान मुले घराबाहेर खेळत असतील तर त्यांच्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. बिबट्या सदृश्य पाणी दिसल्यास वनविभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री पवार यांनी केले आहे.


यावेळी धैर्यशील पाटील (उपवनसंरक्षक), जयश्री पवार (वनक्षेत्रपाल), शंकर कुताटे (वन पाल), यशोदा आदलिंगे (वनरक्षक), अनिता शिंदे, शुभांगी कोरे , बापू भोई, कृष्णा निरवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले, भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नीळ, उद्योजक संजय पवार, सुरेश राठोड, उपसरपंच किसन भोसले, राजेंद्र भोसले, प्रसाद निळे, लक्ष्मण साबळे, मनोज निंबाळकर, अजित सय्यद, पोलीस पाटील मधुकर शिंदे, ग्रामसेवक कांबळे, सुदर्शन माळी, सोमनाथ राऊत, प्रकाश भोसले, पप्पू यमगर, आदीजण उपस्थित होते

Web Title: Seize leopards by summoning expert officers; Suggestions given by Vijaykumar Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.