सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले

By राकेश कदम | Published: April 5, 2023 07:14 PM2023-04-05T19:14:51+5:302023-04-05T19:17:01+5:30

रयत क्रांतीचे आंदाेलन; प्रादेशिक सहसंचालकांनी आयुक्तांना पाठविले पत्र

Seizure of 25 sugar factories in Solapur, action proposed; 577 crores of farmers were exhausted | सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले

सोलापुरातील २५ साखर कारखान्यांवर जप्ती, कारवाईचा प्रस्ताव; शेतकऱ्यांचे ५७७ काेटी रुपये थकले

googlenewsNext

राकेश कदम

सोलापूर :जिल्ह्यातील २५ कारखान्यांकडे उस बिलाची ५७७ काेटी रुपये एफआरपी थकीत आहे. या कारखान्यांवर महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नुसार कारवाई करणे आवश्यक असल्याचे पत्र प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे यांनी बुधवारी साखर आयुक्तांना पाठविले. गेल्या चार महिन्यात पाठविलेले हे चाैथे पत्र आहे. एकाही पत्रावर कार्यवाही झाली नसल्याचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला. अजूनही अनेक कारखान्यांनी एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) दिलेला नाही. या कारखान्यांवर कारवाई करावी या मागणी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयासमाेर निदर्शने केली. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भाेसले, हणुमंत गिरी, समाधान फाटे, छगन पवार, नामदेव पवार, तनुजा जवळे, बाळासाहेब बाेबडे, लक्ष्मण बिराजदार, नागेश नाईकवाडे, रमेश भंगे, राजकुमार बिराजदार, सुनिता चव्हाण, प्रियंका दाेडांळे, वेष्णवी लाेहार, श्रीदेवी रेड्डी, रेणुका लाेहार आदी उपस्थित हाेते. या आंदाेलनानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी २५ कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करण्यात यावी, असे पत्र पाठविले. 

रयत क्रांती संघटनेच्या आंदाेलनामुळे प्रादेशिक सहसंचालकांनी कारवाईचा प्रस्ताव ठेवला. साखर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन कारखान्यांवर कारवाई केली पाहिजे. अन्यथा साखर आयुक्तालयासमाेर आंदाेलन सुरू हाेईल. अधिकाऱ्यांनी कागदपत्रे नाचविण्याचा फार्स करू नये.
- दीपक भाेसले, कार्याध्यक्ष, रयत क्रांती संघटना. 

या साखर कारखान्यांकडे थकलेली एफआरपी

मकाई  - २६ काेटी, कुर्मदास - ११ काेटी, लाेकनेते - २, सासवड माळी शुगर्स - २२ काेटी, लाेकमंगल दारफळ -४ काेटी, लाेकमंगल भंडारकवठे - २ काेटी, सिध्दनाथ - ४९ काेटी, जकराया - १४ काेटी, इंद्रेश्वर शुगर्स - १६ काेटी, भैरवनाथ शुगर्स विहाळ - २९ काेटी, भैरवनाथ शुगर्स लवंगी - ३१ काेटी, युटाेपियन शुगर्स - २० काेटी, माताेश्री - २४ काेटी, भैरवनाथ शुगर्स आलेगाव - ३७ काेटी, बबनराव शिंदे शुगर्स - ४ काेटी, जय हिंद शुगर्स - १२ काेटी, विठ्ठल शुगर्स करमाळा - ८३ काेटी, आष्टी शुगर्स - १७ काेटी, भीमा सहकारी - ५२ काेटी, सहकार शिराेमणी भाळवणी -४४ काेटी, सीताराम महाराज खर्डी - ९ काेटी, सांगेाला सहकारी - १२ काेटी, शंकर सहकारी - २३ काेटी, आवताडे शुगर्स - १४ काेटी, येडेश्वर - ३ काेटी, सिध्देश्वर ३४ काेटी.
(साखर आयुक्ताकडील माहितीनुसार)

Web Title: Seizure of 25 sugar factories in Solapur, action proposed; 577 crores of farmers were exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.