साेलापूर भाजपचे चलाे विजयपूर अन् बेळगाव; प्रचारात सहभागी हाेणार
By राकेश कदम | Published: April 14, 2023 07:53 PM2023-04-14T19:53:45+5:302023-04-14T19:53:57+5:30
प्रदेश कमिटीने आखून दिला कार्यक्रम, भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीबाबत विशेष दक्षता घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सोलापूर - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे जिल्ह्यातील दाेन खासदार, पाच आमदार आणि कार्यकर्ते सहभागी हाेणार असल्याचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी सायंकाळी सांगितले.
भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीबाबत विशेष दक्षता घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नेत्यांना या निवडणुकीत सहभागी करुन घेतले आहे. साेलापूर हा कर्नाटकच्या सीमेलगतचा जिल्हा आहे. साेलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यातील मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी साेपविली आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे शुक्रवारी दुपारी बेळगावकडे रवाना झाले. आमदार विजयकुमार देशमुख शनिवारी सकाळी जाणार आहेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे हे रविवारी जाणार आहेत. खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर प्रदेश कमिटीकडून निराेप येताच कर्नाटकच्या प्रचारात सहभागी हाेतील, असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.