शासनाच्या ग्रंथसूचित भाषण कला पुस्तकाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:05+5:302021-02-07T04:21:05+5:30
बार्शी : राज्य शासनाच्या ग्रंथालय सूचीमध्ये लेखक सचिन वायकुळे यांच्या ‘भाषण कला’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. ...
बार्शी : राज्य शासनाच्या ग्रंथालय सूचीमध्ये लेखक सचिन वायकुळे यांच्या ‘भाषण कला’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने ही निवड केली आहे.
शासकीय ग्रंथालयासाठी राज्यातील दर्जेदार व वाचनीय ग्रंथांची निवड केली जाते. ग्रंथालय निवड समितीची निवड करून ते ग्रंथालय संचालनालयाला सादर करते. माजी संचालक सुभाष राठोड यांनी ‘भाषण कला’ हे पुस्तक सर्वांसाठीच आवश्यक असल्याचे सांगून ते निवड यादीत ठेवले. दरम्यान, कोरोना महामारी आल्याने काही काळ निघून गेला. यानंतर सद्य:स्थितीत कार्यरत शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या संचालक शालिनी इंगोले यांनी या पुस्तकाची शिफारस करत राज्यातील शासकीय ग्रंथालयांच्या सूचित याचा समावेश केला आहे. संचालनालयातील तांत्रिक सहायक सीमा /////////गांगण//////// यांचे ग्रंथालय निवड समितीचे माजी सदस्य हरिदास रणदिवे यांनी याबद्दल कौतुक केले आहे.
----