सुंदर गाव योजनेत भेंडची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:08+5:302021-02-16T04:23:08+5:30
जिल्हा पातळीवर आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी निवड झाल्याचे भेंडचे सरपंच डॉ. संतोष दळवी यांनी सांगितले. यापूर्वी सरपंच दळवी व त्यांचे ...
जिल्हा पातळीवर आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी निवड झाल्याचे भेंडचे सरपंच डॉ. संतोष दळवी यांनी सांगितले. यापूर्वी सरपंच दळवी व त्यांचे सर्व सहकारी व ग्रामस्थांनी या गावांत विविध विकासात्मक कामे केले आहेत. २०१८ व १९ मध्ये पाणी फाउंडेशन अंतर्गत लोकसहभागातून उत्कृष्ट काम केल्याबद्दल तालुक्यातील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवून ३०० वृक्षांची लागवड केली. याच गावच्या शिवारात असलेल्या वन विभागामध्ये ५००० विविध प्रकारच्या बियांचे रोपण केले. गावाचे सुशोभिकरण, संपूर्ण गाव सांडपाणी व हागणदारीमुक्त, घरोघरी एलईडी दिवे, गटशेती स्थापन करून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन, प्लास्टिक व दारूबंदी, शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप, वैयक्तिक श्रेष्ठ ते घरोघरी नळ कनेक्शन, सार्वजनिक ठिकाणी हायमास्ट, बचत गटामार्फत महिलांना उद्योग व्यवसायाची संधी यासह विविध उपक्रम सरपंच डॉ. दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविली. त्यामुळे झेडपीने या सर्व कामांची दखल घेऊन भेंडची निवड केली आहे. यापूर्वी लोकमतने आदर्श सरपंच म्हणून त्यांना सन्मानित केले आहे.
फोटो
१५संतोष दळवी