महिला पोस्टमनकडून कोरोना काळात सेवा व जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:20 AM2021-05-22T04:20:55+5:302021-05-22T04:20:55+5:30
दररोज कळमण ते वाळूज दहा किमी अंतरावरून अपडाऊन करून पोस्टाची थैली ने-आण करतात. पोस्टमास्तर भगवान कुलकर्णी आणि पोस्टमन पूजा ...
दररोज कळमण ते वाळूज दहा किमी अंतरावरून अपडाऊन करून पोस्टाची थैली ने-आण करतात. पोस्टमास्तर भगवान कुलकर्णी आणि पोस्टमन पूजा कोळी या कोरोना महामारीच्या काळातही सेवा घरपोच देत आहेत. त्यावेळी बटवडा करताना मास्क असेल तरच पत्र रजिस्टर पोहच पावती देतात. सोशल डिस्टन्स नियम पाळले तरच पत्राचा बटवडा करत असताना नागरिकांना मास्कचा वापर करा असे म्हणून जनजागृती करतात.
पोस्ट ऑफिस कार्यालयात आरडी ठेव, सेव्हिंग ठेव, विमा पॉलिसी, सुकन्या समृध्दी ठेव व इतर कामांसाठी ग्राहक असल्यास यांना मास्क असेल तरच या सुविधा दिल्या जातील असे पोस्टमास्तर भगवान कुलकर्णी आणि पोस्टमन पूजा कोळी यांनी सांगितले.
---
फोटो २१ वाळूज
वाळूजच्या महिला पोस्टमन पूजा कोळी या गावामध्ये फिरून पत्रांचे वाटप करत असताना.