बहीण-भावाकडून बाधित रुग्णांची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:19+5:302021-05-05T04:36:19+5:30
जिल्हा दूध संघाचे केंद्रप्रमुख राजेंद्र भोंग व सविता भोंग या दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपत गावात सुरू झालेल्या कोविड ...
जिल्हा दूध संघाचे केंद्रप्रमुख राजेंद्र भोंग व सविता भोंग या दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपत गावात सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी आपल्या बीफॉर्म झालेली मुलगी ऋतुजा व मुलगा ऋषिकेश या दोघांना रुग्णाची सेवा करण्यास स्वेच्छेने पाठवले आहे.
वीट ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गाव व वाड्यावस्तीवरील बाधित रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असून डॉक्टर, नर्सची कमतरता भासत आहे. एकंदरीत रुग्णसेवेवर ताण पडत आहे. गावात कोविड सेंटर चालू झाल्याने तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची गरज ओळखून राजेंद्र भोंग व सविता भोंग या दांपत्याने आपणही गावचे काही तरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून मुलगा ऋषिकेश, मुलगी ऋतुजा या बहीण भावास गावातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करण्यास परवानगी दिली. कोविड सेंटरमध्ये दिवसभर ऋतुजा रुग्णांची सेवा करणार असून रात्रभर ऋषिकेश सेवा देणार आहे.
कोट :::::::::
कोरोना काळात गावकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळतेय हे पाहून आम्ही दोघा मुलांना सेवा देण्यास सांगितले व मुलांनीसुध्दा आनंदाने सेवा देण्याची तयारी दर्शवली.
-
राजेंद्र भोंग, वीट
फोटो
०३वीट०१
ओळी
वीट येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा देणारे ऋषिकेश व ऋतुजा.