रुग्णवाढ कमी करण्यासाठी डेडिकेटेट हॉस्पिटल उभे करा; रिपाइंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:54+5:302021-04-30T04:27:54+5:30
निवेदनात म्हटले आहे की, कुर्डूवाडी शहरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे व मध्यमवर्गीय नागरिकांना वर्षापासून आर्थिक फटका बसला आहे. ...
निवेदनात म्हटले आहे की, कुर्डूवाडी शहरातील गोरगरीब, हातावर पोट असणारे व मध्यमवर्गीय नागरिकांना वर्षापासून आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पैसा नसल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन ते सध्या उपचार घेऊ शकत नाहीत. अपुऱ्या सुविधांमुळे येथील काही रुग्णांना तर आपले प्राण गमवावे लागत आहेत.
यामुळे विकासकामे थांबवून त्याचा निधी डेडिकेटेड हॉस्पिटल उभारणीसाठी वर्ग करावा, असे म्हटले आहे.
या निवेदनावर आरपीआयचे नेते आकाश जगताप, अमर माने, बाळासाहेब शेंडगे, गणेश समदाडे, शरद शिंदे, कृष्णा अस्वरे, सोनू झिंगळे, आप्पा वाघमारे, बंडू भोसले, राजू दणाणे, समद मुलाणी, जितू गायकवाड, विशाल मोरे, विक्रांत मोरे, कपिल शिवशरण, पप्पू जगताप, बबन जगताप, अण्णा नायडू, वसीम मुलाणी यांच्या सह्या आहेत.
.......................